ETV Bharat / city

आज पंजाब खवळलाय, उद्या संपूर्ण देश पेटला तर काय होईल?

कडाक्याच्या थंडीतही पंजाबच्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला घाम फोडला आहे. आंदोलन मागे घेण्याचे सोडाच ते अधिक जहाल आणि तीव्र होताना दिसत आहे. शेतकऱ्यांना बदनाम करणाऱ्या आयटीसेलला ट्विटरने फटकारले आणि वास्तविकतेची जाणीव करून दिली. पंतप्रधान आणि गृहमंत्री कोणालाही झुकवू शकतात, हा गैरसमज पंजाबच्या शेतकऱ्यांनी खोटा ठरवल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

author img

By

Published : Dec 4, 2020, 10:20 AM IST

SHIVSENA
सामना

मुंबई - मोदी सरकारचे तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. गरुवारी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी शेतकरी नेत्यांसोबत विज्ञान भवनात बैठक घेतली. मात्र, आठ तास चाललेली ही बैठक निष्फळ ठरली. मोदी सरकारने कृषी कायदे कसे साखरेच्या पाकात घोळून बाहेर काढले आहेत त्याचे प्रात्यक्षिक दाखवले, पण शेतकरी नेते सरकारचे चहा-पाणी न पिता बैठकीतून निघून गेले, या सर्व प्रकरणावरून शिवसेनेने सामनातून केंद्र सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, हम करे सो कायदा चालणार नाही, शेतकऱ्यांनी केंद्राला गुडघ्यावर आणले असा हल्लाबोल सामनातून करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारची कोंडी -

कडाक्याच्या थंडीतही पंजाबच्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला घाम फोडला आहे. आंदोलन मागे घेण्याचे सोडाच ते अधिक जहाल आणि तीव्र होताना दिसत आहे. शेतकऱ्यांना बदनाम करणाऱ्या आयटीसेलला ट्विटरने फटकारले आणि वास्तविकतेची जाणीव करून दिली. गेल्या सहा वर्षात सुपरमॅन मोदी सरकारची भयंकर कोंडी आणि फजिती कधीच झाली नव्हती. पंतप्रधान आणि गृहमंत्री कोणालाही झुकवू शकतात, हा गैरसमज पंजाबच्या शेतकऱ्यांनी खोटा ठरवल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

आंदोलनातील आज्जी आणि कंगना राणौत -

दुसरे प्रकरण मुंबईस पाकव्याप्त कश्मीर म्हणणाऱ्या भाजपच्या बेताल नटीचे. शेतकरी आंदोलनात भाग घेणाऱ्या एका वृद्ध ‘चाची’ला या नटीने शंभर रुपये रोजावर काम करणारी शाहीन बागवाली ‘आण्टी’ ठरवले. हे प्रकरणसुद्धा खोटे ठरले व त्या बेताल नटीला माघार घ्यावी लागली. एवढंच नव्हे तर त्या वृद्ध आजींनी या नटीला सुनावलेदेखील. ‘‘आपली १०० एकर जमीन आहे आणि या नटीने माझ्या शेतात काम करावे. मी तिला ६०० रुपये देते. तिने कापसाची एक गोणी उचलून दाखवावी,’’ अशा शब्दांत या आजींनी बेताल नटीला तिची जागा दाखवली. अशी अनेक प्रकरणे रोजच शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत घडत आहेत. सरकारच्या व भाजप सायबर फौजांच्या हातचलाख्यांचा भंडाफोड होत आहे. ‘मोदी है तो मुमकीन है’ या घोषणेचा फज्जा उडताना दिसत आहे, असा हल्लाबोल सामनातून करण्यात आला आहे.

मोदी सरकारने अन्यायाची नोटाबंदी पचवून ढेकर दिला. जीएसटीने केलेला सत्यानाश पचवला. बेरोजगारी, महागाईवर हिंदू-मुसलमान झगडा, हिंदुस्थान- पाकिस्तानचा उपाय दिला. लॉक डाऊनने जेरीस आलेल्या जनतेला अयोध्येत राममंदिराचे तबक दिले, पण पंजाबच्या शेतकऱ्यांसमोर त्यांचे कोणतेही ‘लॉलीपॉप’ चालले नाही. हे यश पंजाबच्या एकीत आहे.

पुरस्कार वापसी -

अमित शहा यांनी वारंवार आंदोलकांना माघार घेण्याचे आवाहन केले. शेवटी पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर यांना चर्चेतून तोडगा निघावा यासाठी दिल्लीत पाचारण करावे लागले. आम्ही दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील एकजुटीचा वारंवार उल्लेख करतो. कारण एकजूट हेच मोठे यश आहे. पंजाबातील सर्व गायक, कलावंत, खेळाडू यांनी त्यांचे राष्ट्रीय पुरस्कार केंद्राला परत करायचे ठरवले आहे व भाजपवाले खिल्ली उडवतात तशी ही काही पुरस्कार वापसी गँग नाही. पद्मश्री, पद्मभूषण, अर्जुन पुरस्कार परत करून ही मंडळी शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत आहेत. आमचा शेतकरीच जगला नाही, तर हे पुरस्कार छातीवर मिरवून काय करायचे? असा सवाल या सर्व मंडळींनी सरकारला विचारला आहे. या सर्व पुरस्कार परत करणाऱ्यांचे कौतूक सामनातून करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात एकीचे दर्शन कधी होणार -

संयुक् महाराष्ट्र लढ्यात पंडित नेहरुंच्या तोंडावर अर्थमंत्रीपदाचा राजीनामा फेकणारे चिंतामणराव देशमुख पुन्हा या मातीत निपजले नाहीत. महाराष्ट्रावर अनेक प्रसंग आले-गेले मात्र, पंजाबातील खेळाडू, कलावंतांप्रमाणे किती मराठी बुद्धिजीवी लोक महाराष्ट्राच्या प्रश्नी एकजुटीने उभे राहीले, असा सवाल सामनातून करण्यात आला. पंजाबच्या शेतकरी एकजुटीची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली आहे. याप्रकरणी मोदी सरकारची कोंडी झाल्याचा आम्हाला आनंद नाही, मात्र, मोदी सरकारने शेतकऱ्यांचे ऐकावे एवढीच मागणी असल्याचे सामनातून म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.