ETV Bharat / city

Uddhav Thackeray शिवसेना कोणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, उद्धव ठाकरे म्हणतात, जे होईल ते होईल

शिवसेना कोणाची? shivsena vs shinde group याचा निर्णय सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी supreme court hearing over shivsena vs shinde group होणार आहे त्यावर जे होईल ते होईल आपला न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं shivsena chief uddhav thackeray on supreme court hearing आहे

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
author img

By

Published : Aug 21, 2022, 4:52 PM IST

Updated : Aug 21, 2022, 5:19 PM IST

मुंबई - शिवसेना कोणाची? याचा निर्णय उद्या ( 22 ऑगस्ट ) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार supreme court hearing over shivsena vs shinde group आहे. धनुष्यबाणं चिन्ह कोणाचं?, अपात्र आमदाराचं काय?, शिंदे-फडणवीस सरकारचं काय होणार?, प्रकरण घटनापीठाकडे जाणार का?, यावरती उद्या निर्णय होणार shivsena vs shinde group आहे. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जे होईल ते होईल. आपला न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, या सर्व प्रकरणात जनतेच्या भावना या आपल्यासोबत असल्याचे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं shivsena chief uddhav thackeray on supreme court hearing आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधताना

'गद्दारांना धडा शिकवू' - विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या उपसभापती कार्याच्या अहवालाचे पुस्तक प्रकाशन मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांनी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, लोक निवडणुकीची वाट बघत आहेत. कधी एकदा निवडणूक येते आणि या गद्दारांना धडा शिकवू. मात्र, निवडणुका लवकर घेण्याची यांच्यात हिंमत नाही, असा टोला एकनाथ शिंदे गटाला उद्धव ठाकरे यांनी लगावला. यावेळी राज्यांमध्ये होणार्‍या महिला अत्याचारांवर देखील उद्धव ठाकरे यांनी बोट ठेवले. भंडारा जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची घडलेली घटना निंदनीय असून, न्याय मिळेपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही. या प्रकरणांत कोणताही जाती-धर्म आणता कामा नये, असा इशारा उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी पक्षाला दिला आहे.

'तिकडे निष्ठेचे खोके येत आहेत' - पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीलाच बंडखोर आमदारांना विरोधकांकडून चांगलीच टोलेबाजी करण्यात आली होती. 50 खोके, एकदम ओके, अशा घोषणा बंडखोर आमदारांना पाहून दिल्या गेल्या. यावर उद्धव ठाकरे यांनीही 'तिथे फक्त निष्ठेचे खोके येत आहेत,' असा टोला बंडखोर आमदारांना लगावला आहे.

'मंत्र्याला सभागृहात खडसावल्याबद्दल अभिनंदन' - गुरुवारी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत नीलम गोऱ्हेंनी मंत्री गुलाबराव पाटील यांना खाली बसून बोलल्याबद्दल चांगलेच खडसावले होते. याबाबतही उद्धव ठाकरे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हेंचे अभिनंदन केलं आहे. सभागृहाचे पावित्र्य राखले गेलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहाचे नियम पाळले नाही तर त्यांनाही खडसावलं पाहिजे, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला. नीलम गोऱ्हेंचं पुस्तक प्रकाशनावेळी त्यांचा शिवसेनेशी कसा संबंध आला. शिवसेनेच्या विचाराचे ही नसतानाही नीलम गोऱ्हेंनी शिवसेनेचे विचार कसे स्वीकारले याबाबत देखील उद्धव ठाकरे यांनी आठवण बोलून दाखवली.

हेही वाचा - Shiv sena Vs Shinde Group महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर उद्या फैसला, सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी

Last Updated : Aug 21, 2022, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.