मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलटफेर झाला आहे. सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यावर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यांनी राज्याच्या राज्यपालांकडे स्वतः राजीनामा सुपूर्द केला आहे.
यानंतर आता राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांचे मिळून सरकार बनणार हे निश्चित झाल्यानंतर मुंबईतील शिवालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी येऊन जल्लोष केला. यावेळेस हातात भगवे झेंडे घेत रस्त्यावर फटाके फोडून ढोल-ताशे बडवत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.