मुंबई - राणा दाम्पत्याच्या खार येथील घरासमोर हंगामा केल्याप्रकरणी 6 शिवसैनिकांना ( Shivsainik Arrest By Khar Police ) अटक खार पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. राणा दाम्पत्यानी दिलेल्या तक्रारीवर ( Ravi Rana File Complaint Against Shivsainik ) ही कारवाई करण्यात आली आहे. काल राणा दाम्पत्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी ही तक्रार खार पोलीस स्टेशनला दिली होती.
-
Maharashtra | Khar police arrested 6 Shiv Sena workers after Police registered a case yesterday against party workers who created ruckus outside the residence of Navneet & Ravi Rana. Search for other accused underway: Mumbai Police
— ANI (@ANI) April 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra | Khar police arrested 6 Shiv Sena workers after Police registered a case yesterday against party workers who created ruckus outside the residence of Navneet & Ravi Rana. Search for other accused underway: Mumbai Police
— ANI (@ANI) April 24, 2022Maharashtra | Khar police arrested 6 Shiv Sena workers after Police registered a case yesterday against party workers who created ruckus outside the residence of Navneet & Ravi Rana. Search for other accused underway: Mumbai Police
— ANI (@ANI) April 24, 2022
राणा दाम्पत्याची तक्रार - एकीकडे राणा दाम्पत्याला खार पोलीस स्टेशनमध्ये अटक केल्यानंतर दुसरीकडे राणा दाम्पत्याने उलट तक्रार नोंदवली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि परीवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात राणा दाम्पत्याने तक्रार दाखल केली होती. तसेच त्यांच्या खार येथील घरावर हल्ला केल्याचा आरोप करत शिवसैनिकांविरोधातही तक्रार दाखल केली होती. संजय राऊतांनी शिवसैनिकांना चिथवल्याचे आणि मुख्यमंत्र्यांनी जिवे मारण्यासाठी कट रचल्याचा आरोप राणांनी आपल्या तक्रारीत केला होता. त्यामुळे, खार पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या.
राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी - दरम्यान, राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर आज त्यांना वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन ( Rana couple sent to judicial custody ) कोठडी सुनावण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेले मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचणार, अशी घोषणा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( Navneet rana judicial custody ) आणि आमदार रवी राणा ( Rana couple Bandra court ) यांनी केल्याने शिवसेना विरुद्ध राणा असा सामना रंगला होता. या प्रकरणात राणा ( Ravi rana judicial custody ) दाम्पत्याला चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी खार पोलिसांकडून शनिवारी अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्याची शनिवारची रात्र जेलमध्येच गेली. त्यांना आज दुपारी मुंबईतील वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात ( Rana couple bandra court news mumbai ) हजर करण्यात आले. न्यायालयाने राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली ( Rana couple judicial custody ) आहे. राणा दाम्पत्यांकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. 29 एप्रिल रोजी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. नवनीत राणा यांची भायखला कारागृहात, तर रवी राणा यांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी होणार आहे.
हेही वाचा - Rana couple sent to judicial custody : राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, राजद्रोहचा गुन्हा