ETV Bharat / city

मराठी मतात फूट पडणाऱ्यांना 'ए लाव रे ते फटाके' एवढेच सांगायचे - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ए लाव रे ते फटाके एव्हढीच प्रतिक्रिया असल्याचे सांगितले.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे
author img

By

Published : May 23, 2019, 7:00 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर यापुढील प्रत्येक निवडणूक युतीमध्ये लढवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर मराठी मतांमध्ये फूट पडणाऱ्यांना 'ए लाव रे ते फटाके' एवढच सांगायचे असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर संयुक्त पत्रकर परिषद घेतली. यात पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मतदारांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. त्यासोबतच जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी दुष्काळावर मात करण्याला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मदत मिळवण्यात यशस्वी ठरली. तरीही सेना भाजप यांच्या विजयासाठी तेच एकमेव कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे दिग्गज उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी काहीही बोलायला नकार दिला. लोकशाहीचे हेच खरं रूप असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी आपल्या दारुण पराभवाचे आत्मपरीक्षण करावे. त्यातून योग्य तो धडा घ्यावा, आम्ही कायम विकासाची बाजू घेऊन निवडणूक लढवल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
विजयाचे सेलिब्रेशन या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना पेढा भरवून केले. यावेळी पत्रकारांच्या आग्रहाखातर रश्मी ठाकरे यांनीही उद्धव यांना पेढा भरवला. तर रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करून या पत्रकार परिषदेत खरी गम्मत आणली. राम मंदिर भाजपच्या अजेंड्यावर असल्याने ते नक्की पूर्ण होईल असे उद्धव आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Intro: लोकसभा निवडणूकीत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर यापुढील प्रत्येक निवडणूक युतीमध्ये लढवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर मराठी मतांमध्ये फूट पडणार्यांना ए लाव रे ते फटाके एवढंच सांगायचं असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

लोकसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी संयुक्त पत्रकर परिषद घेतली. यात पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मतदारांनी आपल्यावर दाखवले विश्वासाबद्दल आभार मानले.

त्यासोबतच जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी दुष्काळावर मात करण्याचा प्रथम प्राधान्य देणार असल्याचे सांगितल

वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मदत मिळवण्यात मदत मिळवण्यात यशस्वी ठरली असली तरीही सेना भाजप यांच्या विज्यासाठी तेच एकमेव कारण नसल्याचं त्यांनी सांगितलं.

शिवसेनेचे दिग्गज उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी काहीही बोलायला नकार दिला लोकशाहीचं हेच खरं रूप असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी आपल्या दारुण पराभवाचा आत्मपरीक्षण करावं आणि त्यातून योग्य तो धडा घ्यावा आम्ही कायम विकासाची बाजू घेऊन निवडणूक लढण्याचा त्यांनी आवर्जून सांगितलं.

विजयाच सेलिब्रेशन या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना पेढा भरवून केलं. तर यावेळी पत्रकारांच्या आग्रहाखातर रश्मी ठाकरे यांनीही उद्धव याना पेढा भरवला. तर रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करून या पत्रकार परिषदेत खरी गम्मत आणली.

राम मंदिर भाजपच्या अजेंड्यावर असल्याने ते नक्की पूर्ण होईल असं उद्धव आणि मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.