ETV Bharat / city

पश्चिम बंगालमध्ये घडलेला हिंसाचार लोकशाहीसाठी दुर्दैवी - संजय राऊत - Sanjay Raut

अमित शाह यांच्या रोड शोदरम्यान झालेल्या हिंसाचाराला राज्य सरकार जबाबदार आहे. जे घडले ते लोकशाहीसाठी दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

खासदार संजय राऊत
author img

By

Published : May 15, 2019, 3:00 PM IST

मुंबई - भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शोदरम्यान झालेल्या हिंसाचाराला राज्य सरकार जबाबदार आहे. जे घडले ते लोकशाहीसाठी दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. आपल्या कार्यालयात ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

खासदार संजय राऊत

लोकशाहीत कुणी कुणाकडे प्रचाराला जावे यावर बंधन नाही. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांना प्रचारासाठी येऊ न देण्याची भूमिका घेतली. बॅनर्जी यांची भूमिका योग्य नाही. ममतांना गुजरातमध्ये जाण्यापासून कोणी रोखले होते का ? असा सवालही राऊत यांनी केला.

तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या दंग्यात ईश्वरचंद्र विद्यासागरांचा पुतळा तोडण्यात आला. हे ही दुर्दैवी असल्याचेही राऊत म्हणाले.

एनडीएचे सरकार येईल....

लोकसभेच्या निकालाची सर्वानाच उत्कंठा असून 23 मेपर्यंत अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. मला वाटते एनडीएचे सरकार येईल, असेही खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. अनेकांनी अंदाज व्यक्त केला आहे, अल्पमतातले सरकार येईल, पण याआधी ही अल्पमतातली सरकार टिकले आहेत. त्यामुळे अल्पमतातील सरकार आले तर ते टिकेल याबाबत चिंता नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी दौऱ्याबाबत शरद पवार यांच्यावर टीका

शिवसेना ही आपल्या परीने दुष्काळी उपाययोजनांची कामे करत आहे. मात्र दुष्काळी दौऱ्यात आम्ही मुलाखत देत फिरत नाही, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला.

शिवसेनेचं १८ जिल्ह्यात काम सुरू आहे,

चारा छावण्या, पाणी टँकर, अशी सगळी मदत आम्ही पोहचवत आहोत, उद्धव ठाकरे जरी भारताबाहेर असले तरी रोज ते याबाबात माहिती घेत आहेत, असेही राऊत यांनी सांगितले.

Intro:पश्चिम बंगालमध्ये जे घडलं ते लोकशाहीसाठी दुर्देव- संजय राऊत

मुंबई 15

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रचाराच्या रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचाराला स्थानिक राज्य सरकार जबाबदार असून जे घडलं ते लोकशाहीसाठी दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. आपल्या कार्यलयात ते पत्रकारांशी बोलत होते.

लोकशाहीत कोणी कोणाकडे प्रचाराला जावं यावर बंधन नाही.मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना प्रचारासाठी येऊ न देण्याची भूमिका घेतली. बॅनर्जी यांची भूमिका योग्य नाही. ममतांना गुजरातमध्ये जाण्यापासून कोणी रोखलं होतं का? असा सवाल ही राऊत यांनी केला.

तृणमूल कॉंग्रेसणी भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या दंग्यात ईश्वरचंद विद्यासागरांचा पुतळा तोडण्यात आला हे ही दुर्देव आहे असेही त्यांनी म्हटले.

एनडीए चे सरकार येईल....

लोकसभेच्या निकालाची सर्वानाच उत्कंठा असून २३ मे पर्यंत अनेक अंदाज व्यक्त जात आहेत. मला वाटतं एनडीएचं सरकार येईल असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. अनेकांनी अंदाज व्यक्त केला आहे की, अल्पमतातले सरकार येईल,पण याआधी ही अल्पमतातही सरकारं टिकली आहेत त्यामुळे अल्पमतातलं सरकार आलं तर टिकेल याबाबत चिंता नाही असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी दौर्याबाबत शरद पवार यांच्यावर टीका

शिवसेना ही आपल्या परीने दुष्काळी उपाययोजनांची कामे करत आहे. मात्र दुष्काळी दौऱ्यात आम्ही मुलाखत देत फिरत नाही, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला.
शिवसेनेचं १८ जिल्ह्यात काम सुरु आहे,
चारा छावण्या, पाणी टॅंकर अशी सगळी मदत आम्ही पोहचवत आहोत, उद्धव ठाकरे जरी भारताबाहेर असले तरी रोज ते याबाबात माहिती घेत आहेत असेही राऊत यांनी सांगितले. Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.