मुंबई - मतदानोत्तर चाचणीचे अंदाज आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा निकाल 100 टक्के खरा असत नाही. त्यामुळे या चाचण्यांवर कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया शिवसेनेच्या बाजूने येत आहेत, याचा आनंद आहे. तरीही शिवसेना आणि भाजप एकत्र सत्तेवर येणार असल्याची खात्री आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
जोशी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत 8 वेळा अशा प्रकारची प्रतिक्रिया देतो. शिवसेना आपल्या कार्यकर्त्यांकडून निकालाबाबत प्रतिक्रिया मागवते. यंदा लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत कार्यकर्त्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया शिवसेनेच्या बाजूने लागल्या आहेत, या गोष्टीचा आंनद होत आहे.
यावरून शिवसैनिक राजकारणी होत आहे, याचा आनंद देखील होत असल्याचे जोशी म्हणाले. निवडणुकीत कोणत्याही पक्षाबाबत अपयश-यश सांगता येत नसल्याचेही जोशी यांनी सांगितले.