ETV Bharat / city

दक्षिण-मुंबई मतदार संघात मताधिक्य टिकवण्याचे युतीसमोर आव्हान.. - Loksabha

दक्षिण मुंबईतील कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, वरळी, भायखळा, शिवडी या सहा विधानसभा मतदारसंघात युतीचे प्राबल्य आहे.

अरविंद सावंत आणि मिलिंद देवरा
author img

By

Published : Apr 3, 2019, 11:20 AM IST

Updated : Apr 3, 2019, 3:11 PM IST

मुंबई - दक्षिण मुंबई मतदार संघ हा उच्चभ्रू लोकवस्तीचा भाग मानला जातो. मोदी लाटेत काँग्रेसचा हा गड शिवसेनेने जिंकला. मात्र या निवडणुकीत शिवसेनेला मिळालेले मताधिक्य टिकवणे हेच युतीसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

माहिती देताना उमेदवार

मलबार हिल, नेपीयंसी रोड, ब्रिचकँडी, पेडर रोड या उच्चभ्रू लोकवस्तीसह कुलाबा, भायखळा, शिवडी येथील काही झोपडपट्यांचा समावेश या मतदार संघात आहे. मोदी लाटेत या मतदार संघात केवळ 54 टक्के मतदान झाले होते. शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी तब्बल 1 लाख 28 हजार मतांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना पराभूत केले होते. मात्र आता लाट ओसरली असल्याने शिवसेनेला विजय मिळणार नसल्याचे काँग्रेसच्या उमेदवाराने सांगितले आहे. तर दक्षिण मुंबई मतदार क्षेत्रात काम केल्याने मतदार पुन्हा पारड्यात मत टाकतील असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

अरविंद सावंतांची संसदेतील उपस्थिती 98 टक्के होती. त्यांनी 279 चर्चेत सहभाग घेतला. तर त्यांनी मतदारसंघ आणि इतर मुद्यांवर 463 प्रश्न विचारले. खासदार फंडाच्या 25 कोटी पैकी त्यांनी 15 कोटी मतदार संघातील कामासाठी खर्च केले आहेत. तर अजूनही 3 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. गेल्या चार वर्षात भाजप शिवसेनेत असलेला वाद आता शमल्याचा दावाही सावंत यांनी केला.

एकेकाळची मोठी बाजारपेठ म्हणूनही हा मतदार संघ ओळखला जातो. काळबादेवी कपडा बाजार, दवा बाजार, लोखंड बाजार, नळ बाजार , मशीद येथील होलसेल व्यापारी तसेच झवेरी बाजारचा जगप्रसिद्ध सोने चांदीच्या कारागिरांचा व्यापार हे येथील वैशिष्ट्य आहे. मात्र या व्यापाऱ्यांच्याही काही समस्यांचे निरसन गेल्या पाच वर्षात झाले नाही.

दक्षिण मुंबईतील कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, वरळी, भायखळा, शिवडी या सहा विधानसभा मतदारसंघात युतीचे प्राबल्य आहे. कुलाब्यात राज पुरोहित, मलबार हिलमध्ये मंगलप्रभात लोढा हे भाजपचे आमदार आहेत. तर वरळीत सुनील शिंदे आणि शिवडीत अजय चौधरी हे शिवसेनेचे आमदार आहेत. मुंबादेवीमध्ये काँग्रेसचे अमिन पटेल तर भायखळ्यामध्ये एमआयएमचे वारिस पठाण आमदार आहेत.

या मतदार संघात मुस्लीम मतदारांची संख्याही मोठी आहे. सर्वपक्षीय आमदार या मतदार संघात असले, तरी महमदअली रोड, डोंगरी, भेंडी बाजार, मशीद बंदर या भागात मोठ्या प्रमाणात मुस्लीम मतदार आहेत.
काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा हे तीन वेळा तर त्यांचे पुत्र मिलिंद देवरा यांनी दोनदा या मतदार संघात विजय मिळवला आहे. मोदी लाटेत शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांना हैट्रिक करू दिली नाही. शिवसेनेमधील सून्दोपसुंदी एकमेकांवरील जहरी टीका यामुळे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

Intro: दक्षिण मुंबई मतदार संघ आढावा....या बातमी साठी LIVE U वरून शिवसेनेचे अरविंद सावंत आणि काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचे 121 पाठवले आहेत. या शिवाय ptc आणि मतदार संघाचे काही शॉट्स ही पाठवले आहेत. आता रिपोर्टर अँप वरून मुस्लिम मतदार , शिवसैनिक यांचे byte आणि काही शॉट्स पाठवत आहे.

anchor

दक्षिण मुंबई मतदार संघ हा उच्चभ्रू लोकवस्तीचा भाग मनाला जातो, मोदी लाटेत काँग्रेसचा हा गड शिवसेनेने जिंकला, मात्र या निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं मताधिक्य टिकवणे हेच आव्हान ठरणार आहे. पाहूया या मतदार संघाचा धावता आढावा

vo1

मलबार हिल, नेपीयंसी रोड, ब्रिचकँडी ,पेडर रोड या उच्चभ्रू लोकवस्ती सह कुलाबा, भायखळा, शिवडी इथल्या काही झोपडपट्यांचा समावेश या मतदार संघात आहे. मोदी लाटेत या मतदार संघात केवळ 54 टक्के मतदान झाले होते. शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी तब्बल एक लाख 28 हजार मतांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना पराभूत केले होते. मात्र आता लाट ओसरली असल्याने शिवसेनेला विजय मिळणार नसल्याचे काँग्रेसच्या उमेदवाराने सांगितले.

byte - मिलिंद देवरा

vo 2

दक्षिण मुंबई मतदार क्षेत्रात काम केले असल्याने मतदार पुन्हा पारड्यात मत टाकतील असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केलाय.
( gfx in) अरविंद सावंत यांची संसदेतील उपस्तिथी 98 टक्के होती. त्यांनी 279 चर्चेत सहभाग घेतला. तर त्यांनी मतदारसंघ आणि इतर मुद्यांवर 463 प्रश्न विचारले आहेत. खासदार फंडाच्या 25 कोटी पैकी त्यांनी 15 कोटी मतदार संघातल्या कामासाठी खर्च केले आहेत. तर अजूनही 3 कोटी रुप्यांची कामे सुरू आहेत
( gfx out)
गेल्या चार वर्षात भाजप शिवसेनेत असलेला वाद आता शमला असल्याचा दावा ही सावंत यांनी केलाय.
byte- अरविंद सावंत, शिवसेनेचे उमेदवार
byte - स्थानिक मतदार, स्थानिक मतदार

vo2
एकेकाळची मोठी बाजारपेठ म्हणूनही हा मतदार संघ ओळखला जातो. काळबादेवी इथला कपडा बाजार, दवा बाजार, लोखंड बाजार, नळ बाजार , मशीद इथले होलसेल व्यापारी तसेच झवेरी बाजार इथला जगप्रसिद्ध सोने चांदीच्या कारागिरांच्या व्यापार हे इथले वैशिष्ट्य, मात्र या व्यापाऱ्यांच्या ही काही समस्यांचे निरसन गेल्या पाच वर्षात झाले नाही.

byte - श्रवण जैन , सोने आणि चांदीचे व्यापारी

vo3

दक्षिण मुंबईतल्या कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, वरळी, भायखळा, शिवडी या सहा विधानसभा मतदारसंघात युतीचे प्राबल्य आहे.
(gfx)
कुलाब्यात राज पुरोहित, मलबार हिलमध्ये मंगलप्रभात लोढा हे भाजपचे आमदार आहेत. तर वरळीत सुनील शिंदे आणि शिवडीमध्ये अजय चौधरी हे शिवसेनेचे आमदार आहेत. मुंबादेवीमध्ये काँग्रेसचे अमिन पटेल तर भायखळ्यामध्ये एएमआयएमचे वारिस पठाण आमदार आहेत. (gfx out)

vo या मतदार संघात मुस्लिम मतदारांची संख्या ही मोठी आहे. सर्वपक्षीय आमदार या मतदार संघात असले तरी महमदली रोड, डोंगरी, भेंडी बाजार, मशीद बंदर या भागात मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार आहेत.

byte- मुस्लिम मतदार

vo3
काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा हे तीन वेळा तर त्यांचे पुत्र मिलिंद देवरा यांनी दोनदा या मतदार संघात विजय मिळवला आहे. मोदी लाटेत शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांना हैट्रिक करू दिली नाही शिवसेनेमधील सूनदोपसंदी एकमेकांवरील जहरी टीका यामुळे पुला खालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

ptcBody:..........Conclusion:
Last Updated : Apr 3, 2019, 3:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.