मुंबई - शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे ( Shiv Sena poster campaign in Mumbai ) यांच्या बंडानंतर संयमाने वागणाऱ्या शिवसैनिकांचा ( Eknath Shinde revolt and Shiv Sena poster mumbai ) आता संयम सुटू लागला आहे. शिवसेनेच्या वतीने पोस्टरबाजी ( Shiv Sena poster news mumbai ) सुरू झाली आहे.
शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे, तसेच शिवसेनेतील आमदारांनी बंड पुकारल्यानंतर ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. मात्र, काल दिवसभरात संयम न सुटलेल्या शिवसैनिकांचा एकनाथ शिंदे आता परतणार नाही, हे जवळपास निश्चित झाल्यानंतर संयम सुटू लागला आहे. शिवसेनेचा भांडुपच्या नगरसेविका दीपमाला बडे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर भलेमोठे पोस्टर लावले आहे.
पोस्टरच्या माध्यमातून बडे यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला असून, तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है, अशा शब्दात आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. याच पद्धतीने आता शहरात विविध ठिकाणी शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू होण्याची शक्यता असून त्यांच्याविरोधात प्रदर्शनही शिवसैनिकांकडून केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.