ETV Bharat / city

Goa Assembly Election 2022 : काँग्रेस सामावून घेईना! शिवसेना राष्ट्रवादीच्या मदतीने गोव्यात लढणार?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा मदतीने शिवसेना (Shiv Sena In Goa) राज्यात 10 ते 15 जागा लढवण्याची शक्यता आहे. (Shiv Sena-NCP alliance In Goa Assembly Election 2022)या संबंधीचा निर्णय येत्या दोन दिवसांत दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या वतीने घेण्यात येणार आहे. (Goa Assembly Election 2022 ) येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि निवडणूक प्रभारी प्रफुल्ल पटेल यांच्यासह जितेंद्र आव्हाड गोव्यात दाखल होणार आहेत.

गोवा विधानसभा निवडणुक 2022
गोवा विधानसभा निवडणुक 2022
author img

By

Published : Jan 17, 2022, 10:54 AM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा मदतीने शिवसेना (Shiv Sena In Goa) राज्यात 10 ते 15 जागा लढवण्याची शक्यता आहे. (Shiv Sena-NCP alliance In Goa Assembly Election 2022)या संबंधीचा निर्णय येत्या दोन दिवसांत दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या वतीने घेण्यात येणार आहे. (Goa Assembly Election 2022 ) येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि निवडणूक प्रभारी प्रफुल्ल पटेल यांच्यासह जितेंद्र आव्हाड गोव्यात दाखल होणार आहेत.

काँग्रेस पक्षाने शिवसेनेला न जिंकता येणाऱ्या जागा ऑफर केल्या

महाराष्ट्र राज्य पद्धतीने गोव्यातही महाविकास आघाडी स्थापन करून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना गोव्यात आग्रही होती. मात्र, त्यांच्या या मागणीला काँग्रेस पक्षाने केराची टोपली दाखवल्यामुळे शिवसेना नाराज झाली आहे असे बोलले जात आहे. तसेच, शिवसेनेचे निवडणूक प्रभारी संजय राऊत मागच्या दोन दिवसापासून काँग्रेस पक्षावर निशाणा साधत आहेत. राऊत यांनी नुकताच गोव्याचा दौरा करून निवडणूक परिस्थितीचा आढावा घेतला होता. काँग्रेस पक्षाने शिवसेनेला न जिंकता येणाऱ्या जागा ऑफर केल्याने शिवसेना नाराज झाली आहे असही बोलेले जात आहे. त्यामुळे शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. वेळ पडल्यास आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती करू आणि तशी बोलणी चालू असल्याचेही राज्य शिवसेना प्रमुख जितेश कामत यांनी ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

राष्ट्रवादी शी युतीचा निर्णय दोन दिवसात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणूक प्रभारी प्रफुल्ल पटेल आणि जितेंद्र आव्हाड पुढील दोन दिवसांत गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यामध्ये ते गोव्यातील निवडणूक परिस्थितीचा आढावा घेऊन आपली उमेदवार यादी निश्चित करण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे. यावेळी खासदार संजय राऊत गोव्यात दाखल होण्याची शक्यता असून दोन्ही पक्षाचे नेते यासंदर्भात युतीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

भाजपचा राज्यात सावध पवित्रा

राज्यात विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार अद्याप घोषीत केले नाहीत. राज्यात सत्तेचा प्रबळ दावेदार म्हणून भाजपकडे पाहिले जात आहे. अशा परिस्थितीत भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. त्यामुळे उशिरा उमेदवारी यादी घोषीत करून बंडखोरांना रोखण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. राज्यातील ४० मतदारसंघांपैकी २४ मतदारसंघात एकेरी उमेदवार आहे. या ठिकाणी भाजपला कोणताही बंडखोरीचा धोका संभवत नाही आहे. मात्र, उर्वरित १२ मतदारसंघात भाजपा कडून दोन किंवा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात प्रामख्याने पणजी, मांद्रे, सांता क्रुझ, सावर्डे, बीचोली या मतदारसंघांचा समावेश आहे.

हेही वाचा - Pandit Birju Maharaj : कथ्थक नर्तक पंडीत बिरजू महाराजांचे हृदय विकाराने निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.