ETV Bharat / city

..त्यावेळी तुम्ही काय केले? संभाजीनगर नामांतरासाठी शिवसेनेचा भाजपावर निशाणा - auranagabad sambajinagar

औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपास गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत. मात्र, काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही, जुनाच आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी त्याचा संबंध जोडणे मुर्खपणाचे लक्षण असल्याचा टोला भाजपला लगावला आहे.

संभाजीनगर नामांतरासाठी शिवसेनेचा भाजपावर निशाणा

author img

By

Published : Jan 2, 2021, 8:04 AM IST

Updated : Jan 2, 2021, 12:14 PM IST

मुंबई - औरंगाबाद शहराचे संभाजीनगर या नामांतराच्या वादावरून सध्या राजकारण तापू लागले आहे. त्यातच काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला जाहीर विरोध केला आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या अमंलबजावनीशी बांधील आहे. काँग्रेसने नामांतराला विरोध केला म्हणून शिवसेना शिवसनेने आपली भूमिका बदलली नसल्याचे जाहीर करत भाजपाने चिंतातूर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये, अशा शब्दात नामांतराच्या मुद्यावरून भाजपाला दैनिक सामनाच्या अग्रलेखातून धारेवर धरले आहे.

संभाजीनगर नामांतरासाठी शिवसेनेचा भाजपावर निशाणा

काय म्हटले आहे सामनात-

औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपास गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत. मात्र, काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही, जुनाच आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी त्याचा संबंध जोडणे मुर्खपणाचे लक्षण असल्याचा टोला भाजपला लगावला आहे.

शिवसेनेने भूमिका बदललेलीच नाही

काँग्रेसच्या विरोधावर शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी अशी भाजपाची मागणी आहे, त्यावर स्पष्टीकरण देताना शिवसेनेने म्हटले आहे की, काँग्रेसचा मुख्यमंत्री असतानाचा बाळासाहेबांनी औरंगाबादचे नाव बदलले आहे आणि जनतेने ते स्वीकारले आहे. तसेच प्रश्न राहिला सरकारी कागदपत्रांचा. त्यावरही लवकरच दुरुस्ती होईल. भाजपास त्याची काळजी नको,’ असे म्हणत शिवसेनेने भूमिका बदलली नसल्याचे सांगत मुखपत्र सामनामधून भाजपवर घणाघाती टीका केली.

औरंगाबादचे संभाजीनगर हा तर लोकनिर्णय-

संभाजीनगर या नामांतरला विरोध असताना शिवसेनेने जे निजामी अवलादीचे आहेत, ते औऱंग्यापुढे आजही गुडघे टेकत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, असा अप्रत्यक्ष टोला काँग्रेसलाही सामनातून लगावण्यात आला आहे.

त्यावेळी तुम्ही का केले नाही? चंद्रकांत पाटलांवर निशाणा

चंद्रकांत पाटील यांनी उत्तरेतील शहरांच्या नामांतराचे दाखले देत औरंगाबादच्या नामांतरांवरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपाचा जो ज्ञानरथ अलीकडच्या काळात उधळला आहे. त्या रथाचे पुढचे चाक म्हणजे चंद्रकांत पाटील आहेत, असा टोला लगावत शिवसेनेने उत्तर भारतातील शहराची नावे बदलली जात होती. त्याच वेळी महाराष्ट्रात सत्तेत असताना तुम्ही औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर का केले नाही? असा सवाल शिवसेनेने केले आहे.

याच बरोबर जी भाजपा आता औरंगाबादच्या नामांतरासाठी हिंदूत्वाच्या आडून शिवसेनेला प्रश्न विचारत आहे. त्यांनीच औरंगजेबाच्या थडग्यासमोर गुडघे टेकणाऱ्या ओविसीच्या पक्षाचा सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला असल्याचा घणाघाती आरोप करत ही गलिच्छ विचारांची शेणफेक असल्याची टीकाही शिवसेनेने भाजपावर केली आहे.

काँग्रेसवालेही ते मान्य करतील-

‘महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील आहे. न्न, वस्त्र, निवारा, पददलितांना न्याय, शेतकरी, कष्टकऱयांना बळ देण्याचा हा कार्यक्रम आहेच. तरीही कोणत्याही राज्याला धर्माचे व सरकारला स्वाभिमानाचे अधिष्ठान हवेच! औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील.औरंग्या हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये,’ असे म्हणत शिवसेनेने भाजपला धारेवर धरलं. त्यामुळे आता संभाजीनगर या नावावरून महाविकास आघाडीत बिघाडी होईल, असे कोणाला वाटत असेल तर ते ठार वेडे आहेत, असा टोलाही भाजपाला लगावला आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी होईल, असे वाटणारे ठार वेडे

काँग्रेसने औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध केला आहे. तशी जाहीर भूमिका काँग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतलेली आहे. त्यावर बोलताना ती काँग्रेसची जुनीच भूमिका असल्याचं म्हटलं. तसेच, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बिघाडी होईल असे समजणे चुकीचं असल्याचंही शिवसेनेने म्हटलं आहे. ‘औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपास गलिच्छ उकळय़ा फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही. जुनाच आहे,’ असं म्हणत काँग्रेसच्या या भूमिकेचा संबंध महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी जोडणे मूर्खपणाचे आहे,’ असे स्पष्टीकरण शिवसेनेने आपल्या मुखपपत्रातून दिलं.

Last Updated : Jan 2, 2021, 12:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.