ETV Bharat / city

Dasara Melava दसरा मेळाव्यावर शिवसेना, शिंदे गट आमने सामने, पालिकेपुढे मात्र पेच - CM Eknath Shinde

Dasara Melava

Dasara Melava
Dasara Melava
author img

By

Published : Sep 2, 2022, 8:33 PM IST

मुंबई मागील ५६ वर्षे शिवसेनेचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा Dussehra gathering at Shivaji Park होत असून यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून लाखो शिवसैनिक उपस्थित राहतात. शिवसेना आणि दसरा मेळावा एक अतूट नाते आहे. यंदा मात्र शिवाजी पार्कवर हा दसरा मेळावा कोणी घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री शिंदे गट आमने- सामने आला आहे. नेहमीप्रमाणे शिवसेनेने परवानगीसाठी पालिकेकडे अर्ज केला असताना आता शिंदे गटानेही या मेळाव्यासाठी पालिकेकडे अर्ज दाखल केला आहे. पालिकेने मात्र परवानगी कोणाला द्यायची, यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. यामुळे मेळावा कोणी घ्यायचा यावरून राजकीय वाद रंगण्याची शक्यता आहे. पालिकेपुढे परवानगी कोणाला द्यायची असा पेच निर्माण झाला आहे.

५६ वर्षे शिवसेनेचा दसरा मेळावा दादर शिवाजी पार्क येथे गेल्या ५६ वर्षे शिवसेनेचा दसरा मेळावा होत आला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे Shiv Sena chief Balasaheb Thackeray काय बोलणार याची उत्सुकता असायची. बाळासाहेबांच्या निधनानंतरही शिवसेनेचा दसरा मेळावा ठरल्याप्रमाणे होत आहे. २०१२ नंतर उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे यापूर्वी मेळाव्यासाठी परवानगीसाठीचा अडथळा कधीही समोर आलेला नाही, किंवा त्याची चर्चाही झालेली नाही. यावेळी मात्र राजकीय समिकरण बदलले आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर राजकीय चित्र बदलून गेले आहे.

दोन्ही अर्जाबाबत निर्णय नाही पक्षाचे नाव, पक्षाचे चिन्ह यावरून वाद सुरु आहे. फुटलेला शिंदे गट आपण शिवसेनाच असल्याचा दावा करत आहेत. हे सर्व सुरु असताना शिंदे गटात सामिल झालेले स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी शिवाजी पार्क येथेच दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्याबाबत महापालिकेच्या जी- नॉर्थ विभागाकडे ३० ऑगस्ट रोजी अर्ज केला आहे. मात्र त्यापूर्वीच म्हणजे २२ ऑगस्टला शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी पालिकेकडे अर्ज केला आहे. मात्र शिवसेनेला अद्याप पालिकेकडून परवानगी मिळालेली नाही. या दोन्ही अर्जाबाबत पालिकेने कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

राजकीय वाद उफाळण्याची शक्यता मुंबई महापालिकेवर सध्या प्रशासक राज आहे. यामुळे आता अप्रत्यक्षरित्या राज्य सरकार म्हणजेच शिंदे- फडणवीस सरकार मुंबई महापालिकेचा कारभार हाकत आहे. शिवाय आम्हीच खरी शिवसेना असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. दरम्यान दसरा मेळावा आणि शिवसेनेचे एक वेगळे नाते आहे. त्यामुळे ही परंपरा कायम राहणार असून शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार असे शिवसेनेने म्हटले आहे. तर दुसरीकडे शिंदे गटही दसरा मेळाव्यासाठी ठाम राहिल्याने राजकीय वाद उफाळण्याची शक्यता आहे.

योग्य तो निर्णय घेऊ सध्या मुंबईतील गणेशोत्सव सुरळीतपणे पार पाडणे हे आमचे प्राधान्यस्थानी आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर अर्जावर योग्य तो निर्णय घेऊ असे पालिकेच्या जी नॉर्थ विभागाचे पालिका सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितले आहे.

एकनाथ शिंदे मार्गदर्शन करतील दरवर्षीप्रमाणेच यंदाही दसरा मेळाव्यासाठी मी अर्ज केला आहे. शिवसेनेमध्ये कोणतेही गटतट नसून एकच शिवसेना आहे. एक नैतृत्व, एक मैदान, एक झेंडा, एक विचार हे यंदाच्या दस-या मेळाव्याचे घोषवाक्य आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मार्गदर्शन करतील, असे शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी संगितले आहे.

तेव्हा अर्ज का केला नव्हता आतापर्यंत विभागाप्रमुख आणि स्थानिक आमदार म्हणून शिवसेना पक्षाकडून सरवणकर हेच दसरा मेळाव्यासाठी अर्ज करायचे. परंतु त्यांना विभाग प्रमुख पदावरून हटवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना अर्ज करण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाही. शिवसेनेच्या स्थापनेपासून दसरा मेळाव्याला एक मोठा इतिहास आहे. शिंदे गटाला काय इतिहास आहे ? जेव्हा सरवणकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, तेव्हा अर्ज का केला नव्हता, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा Thane Crime रूम पार्टनर मैत्रिणीने दिला दगा; 'फोन पे'चा वापर करून गुपचूप रक्कम केली वळती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.