ETV Bharat / city

शिवसेना हेच एक वादळ आहे, आम्हाला इतर वादळाची परवा नाही - उद्धव ठाकरे

हिमालयाच्या संकटाला सुद्धा महाराष्ट्राचा सह्याद्री लागतो. आपल्या सोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला ते मोडीत काढायचे. त्यामुळे मी आज येथे मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे. अन्याय सहन करू नका आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेनाप्रमुखांची परंपरा मी पुढे घेऊन जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

mumbai
वर्धापनदिन साजरा करताना शिवसेना नेते
author img

By

Published : Jun 19, 2020, 4:11 PM IST

Updated : Jun 19, 2020, 4:42 PM IST

मुंबई - कोरोनामुळे दुर्देवी परिस्थिती आहे, तोंडावर मास्क लावायला लागला आहे. पण आपलं तोंड कोणी बंद करु शकत नाही. कोरोनाचं संकट आलं तेव्हा कस्तुरबा आणि पुणे येथे फक्त दोनच लॅब होत्या. त्या आता आपण 100 लॅब केल्या आहेत. आपण लॅब आणखीन वाढवणार आहोत. मला काहीजण म्हणतात की तुम्ही आल्यापासून एका मागोमाग वादळ येत आहे. पण शिवसेना एक वादळ आहे. आम्हाला इतर वादळाची परवा नाही, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

अनिल देसाई, शिवसेना नेते

शिवसेनेच्या 54 व्या वर्धापनदिनी शिवसेना नेते, पदाधिकारी, यांच्याशी झूम अॅपवरुन ते संवाद साधत होते. आज पहिल्यांदाच कोरोनामुळे शिवसेनेचा वर्धापन दिन डिजिटल साजरा करण्यात आला.

शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, माझ्याभोवती हे शिवसैनिकांचं कवच आहे. शिवसैनिकांचं कवच पण आहे आणि त्यांचा वचक सुद्धा आहे. देशावरती चीन नावाच संकट आहे. त्यासाठी संध्याकाळी पाच वाजता पंतप्रधानांसोबत मिटींग असल्याची माहितीही उद्धव ठाकरे यांनी दिली. हिमालयाच्या संकटाला सुद्धा महाराष्ट्राचा सह्याद्री लागतो. आपल्या सोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला ते मोडीत काढायचे. त्यामुळे मी आज येथे मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे. अन्याय सहन करू नका आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेनाप्रमुखांची परंपरा मी पुढे घेऊन जात आहे. विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही, आमची संस्कृती आहे. प्राण जाय पर वचन न जाये, ही आमची संस्कृती आहे. ही लाचार होणारी शिवसेना नाही आणि तुमचा शिवसेनाप्रमुख सुद्धा लाचार होणार नाही. शिवसैनिकांच्या प्रेमाचा ओलावा माझ्या अंगावर आहे. मुंबई ही रक्त सांडून महाराष्ट्राने मिळवलेली आहे. कोणाला आंदण म्हणून दिलेली नाही. म्हणून आपण रक्तदानाचा विश्वविक्रम केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही, डगमगणार नाही. घट्ट पाय रोवून उभा राहतो तो शिवसैनिक आणि हा मर्द शिवसैनिक माझ्यासोबत आहे. शिवसेनेने आपली विचारधारा बदललेली नाही. मी शिवनेरीला आणि एकविरेला दर्शनाला गेलो. शिवनेरीवरची माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो आणि एका वर्षात राम मंदिराचा निकाल आला. आपल्याकडे मुख्यमंत्रीपद आलं ही शिवनेरीच्या मातीची कमाल असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्या सोबत संपर्क जरी कमी झाला असला, तरी मी अंतर कमी पडू देणार नाही असे आश्वासन देखील त्यांनी शिवसैनिकांना दिले. कोरोना हे आपल्या देशावर आलेले विचित्र संकट आहे. शिवसेनेच्या शाखा या आता दवाखाने बनतील. डॉक्टरांना सर्व उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत. जसे की, मास्क, पीपीई कीट, हॅन्डग्लोज. जीवाची पर्वा न करता बेभान होऊन जनतेसाठी झटणारा हा शिवसैनिकच असू शकतो. वादळ येवो, चक्रीवादळ येवो, कोणतंही संकट येवो, तुमच्यासारखा शिवसैनिक माझ्यासोबत जोपर्यंत आहे, मला कशाचीही भीती नाही. अशीच साथ सर्वांनी नेहमीच शिवसेनेसोबत द्या आणि सर्वांनी आपली काळजी घ्या, असे भावनिक आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना उद्देशून केले.

Last Updated : Jun 19, 2020, 4:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.