विरार - आपल्यासारख्या असंख्य बहिणींची माया लाभावी, याकरता माझ्यासारखा नशिबवान मीच! अर्थात; आपणा सर्वांच्या रक्षणार्थ भाऊ म्हणून मी सदैव सज्ज आहेच; पण त्याहूनही आपण माझ्या प्रति दर्शवलेले प्रेम, आपुलकी आणि माझ्या काळजीकरता तुम्ही माझ्या हातावर बांधलेल्या या 'रक्षा'धाग्याकरता माझं आयुष्य तुमच्या सेवेत सदैव समर्पित आहे,' अशा शब्दांत शिवसेना पालघर जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख ( Pankaj Deshmukh ) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राखी पौर्णिमेनिमित्ताने शुभेच्छा - शिवसेना महिला आघाडीच्या ( Shiv Sena Women's Alliance ) वतीने नालासोपारा येथे रक्षाबंधन ( Rakshabandhan ) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालुका संघटक प्रभामामी सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात असंख्य भगिनींनी शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांना राखी बांधून त्यांच्याप्रति हित चिंतले. या वेळी पंकज देशमुख यांनी आपल्या भगिनींच्या सुख-समाधान, कीर्ती-सन्मान आणि संपन्नतेसाठी प्रार्थना केली. सोबतच त्यांनी उपस्थित अन्य सहकाऱ्यांनाही राखी पौर्णिमेनिमित्ताने शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा - Independence Day 2022 स्वातंत्र्याशी संबंधित देशातील 4 ऐतिहासिक स्मारक