ETV Bharat / city

MLC Election 2022 : विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर व आमशा पाडवी यांना उमेदवारी

Legislative Council Shiv Sena nominates : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना विधान परिषदेची निवडणूक ( Legislative Council Election 2022 ) ही २० जूनला होत आहे. यासाठी २ जूनला अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ९ जून पासून अर्ज दाखल करता येणार आहेत व २० जूनला मतदान होणार आहे. शिवसेनेने आज त्यांचे २ उमेदवार निश्चित केले आहेत. वरळीचे माजी आमदार व मंत्री सचिन अहिर तर दुसरीकडे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष आमशा पाडवी यांची नावे निश्चित झाली आहेत. ( Shiv Sena nominates Sachin Ahir ) ( Legislative Council Shiv Sena nominates Amsha Padvi )

Legislative Council Shiv Sena Nominates
विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर व आमशा पाडवी यांना उमेदवारी
author img

By

Published : Jun 7, 2022, 11:36 AM IST

Updated : Jun 7, 2022, 11:50 AM IST

मुंबई - महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक ( Legislative Council Election 2022 ) २० जूनला होत आहे. १० जागांसाठी होणार्‍या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना शिवसेनेने आज त्यांचे २ उमेदवार निश्चित केले आहेत. वरळीचे माजी आमदार व मंत्री सचिन अहिर तर दुसरीकडे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष आमशा पाडवी यांची नावे निश्चित झाली आहेत. ( Legislative Council Shiv Sena nominates )

अटीतटीची निवडणूक? महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना विधान परिषदेची निवडणूक ही २० जूनला होत आहे. यासाठी २ जूनला अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ९ जून पासून अर्ज दाखल करता येणार आहेत व २० जूनला मतदान होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरली असल्याकारणाने याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर व आमशा पाडवी या दोन नेत्यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत.

Legislative Council Shiv Sena nominates
शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर

पक्षाने घेतली माझ्या कार्याची दखल- पाडवी याबाबत बोलताना आमशा पाडवी म्हणाले की, काल शिवसेना खासदार व वरिष्ठ नेते संजय राऊत यांनी त्यांना फोन करून ही बातमी दिली. २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक ते लढले होते. परंतु काँग्रेस चे के. सी. पाडवी यांच्यासमोर काहीशा मतांनी त्यांचा पराजय झाला होता. दुर्गम भागामध्ये केलेल्या कामाचं फळ म्हणून मला ही उमेदवारी दिल्याचही आमशा पाडवी म्हणाले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना नेते सचिन अहिर यांना उमेदवारी पक्षाने जाहीर केली आहे. सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांचे योग्य ते पुनर्वसन योग्य त्या वेळी केले जाईल असे खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्याचबरोबर सचिन अहिर यांचे कार्य पाहता त्यांना विधान परिषदेवर पाठवणे उचित होईल असा एक मतप्रवाह सुद्धा तयार झाला होता. त्या अनुषंगाने सचिन अहिर यांना उमेदवारी दिली गेली आहे.

शिवसेनेचे उमेदवार आमशा पाडवी

राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे? राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी एकनाथ खडसे यांच्या नावांची चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून भेटत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली, असल्याची माहिती पुढे येत आहे. राज्यपाल नियुक्त आमदार यांच्या यादीमध्ये राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांचे नाव देण्यात आलेल आहे. परंतु सध्या या यादीला उशीर होत असल्याकारणाने व एकनाथ खडसे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्यासाठी अडचणी येऊ शकतात अशी शक्यता असल्याने २० जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी एकनाथ खडसे यांना तिकीट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - कुपोषणमुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश, पुणे जिल्ह्यात तीव्र कुपोषित मुलांच्या संख्येत ७८ टक्क्यांनी घट

Last Updated : Jun 7, 2022, 11:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.