ETV Bharat / city

आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीवर शिवसेनेचा मोर्चा

आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीत 6 लाख 45 हजार शेतकऱ्यांनी विमा काढला होता. त्यातील 4 लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम परत मिळाली आहे. मात्र, 724 कोटी जमा करून शेतकऱ्यांना फक्त 212 कोटी रुपयांची मदत आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीने परत दिली आहे. त्यामुळे अद्याप दीड लाख शेतकऱ्यांना आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीने विम्याची रक्कम परत केलेली नाही.

आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनी वर शिवसेनेचा मोर्चा
author img

By

Published : Jul 24, 2019, 7:17 PM IST

मुंबई - शेतकऱ्यांना नडणाऱ्या पिक विमा कंपनी विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वांद्रे कुर्ला संकुल येथे 17 जुलैला मोर्चा काढून विमा कंपनीला 15 दिवसाचा इशारा दिला होता. यानंतर मुंबईतील शिवसेना आमदार, विभाग प्रमुख, नगरसेवक यांनी आज प्रभादेवी येथील आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीवर शिवसेनेचा मोर्चा काढून इशारा दिला आहे.

आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनी वर शिवसेनेचा मोर्चा

आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीत 6 लाख 45 हजार शेतकऱ्यांनी विमा काढला होता. त्यातील 4 लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम परत मिळाली आहे. मात्र, 724 कोटी जमा करून शेतकऱ्यांना फक्त 212 कोटी रुपयांची मदत आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीने परत दिली आहे. त्यामुळे अद्याप दीड लाख शेतकऱ्यांना आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीने विम्याची रक्कम परत केलेली नाही. त्यामुळे आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीला शिवसेनेने 8 दिवसांची मुदत दिली आहे.

कंपनीने लेखी स्वरूपात 8 दिवसात रक्कम त्वरित दिली जाईल असे लेखी आश्वासन शिवसेनेला दिले आहे. असे शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कंपनीच्या व्यवस्थापकांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी आमदार सुनील शिंदे, आमदार अजय चौधरी, आमदार सदा सरवणकर आणि विभाग प्रमुख महिला नगरसेविका उपस्थित होत्या.

Intro:मुंबई - शेतकऱ्यांना नडणाऱ्या पिक विमा कंपनी विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वांद्रे कुर्ला संकुल येथे 17 जुलैला मोर्चा काढून विमा कंपनीला 15 दिवसाचा इशारा दिला होता.
यानंतर मुंबईतील शिवसेना आमदार, विभाग प्रमुख, नगरसेवक यांनी आज प्रभादेवी येथील आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीवर शिवसेनेचा मोर्चा काढून इशारा दिला आहे.Body: या कंपनीत 6 लाख 45 हजार शेतकऱ्यांनी विमा काढला होता. त्यातील 4 लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम परत मिळाली आहे. मात्र 724 कोटी जमा करून शेतकऱ्यांना फक्त 212 कोटी रुपयांची मदत आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीने परत दिली आहे. त्यामुळे अद्याप दीड लाख शेतकऱ्यांना आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीने विम्याची रक्कम परत केलेली नाही. त्यामुळे आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीला शिवसेनेने 8 दिवसांची मुदत दिली आहे. कंपनीने लेखी स्वरूपात 8 दिवसात रक्कम त्वरित दिली जाईल असं लेखी आश्वासन शिवसेनेला दिले आहे असे शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी सांगितले.Conclusion:यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कंपनीच्या व्यवस्थापकांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी आमदार सुनील शिंदे, आमदार अजय चौधरी, आमदार सदा सरवणकर आणि विभाग प्रमुख महिला नगरसेविका उपस्थित होत्या.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.