मुंबई - शिवसेना शिंदे गट वाद सुरु असताना या काळात अनेक पक्षाचे नेते राज्यपालांची भेट घेत (Shivsena Leaders Meet Governor)आहेत. अशात आता शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. या भेटीत शेतकरी प्रश्नांवर चर्चा करुन शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत करावी, यासंदर्भातील निदेवन राज्यपालांना देण्यात आल्याची माहिती विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे तक्रार - शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राज्यातील कायदा व सुव्यवस्था, अतिवृष्टीच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक झाली. आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना निवदेन देऊन तक्रार केली. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून सत्ताधारीच हातात कायदा घेतात, अशी टीका विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Opposition leader Ambadas Danve) यांनी यावेळी बोलताना केली.
राज्यातील साडेतीनशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करत, अतिवृष्टीनंतरही शेतकऱ्यांनी पिके उभे करण्याचा निर्णय केला. मात्र सरकारने ताबडतोब शेतकऱ्यांना मदत दिली नाही शेतकऱ्यांचा जीव गेला. असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केला. राज्यपाल भगतसिंह कोशारी (Bhagat Singh Koshyari rajbhavan mumbai) यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी राज्यपालांकडे तक्रार केली.
मदतीचा केवळ अध्यादेश - सरकारने तीन हजार कोटी रुपये अतिवृष्टीसाठी मदत जाहीर केली. आजही केवळ अध्यादेश निघाला आहे. आत्महत्यांचे प्रमाण अतिवृष्टीमुळे प्रचंड वाढले. या सर्वाला शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार जबाबदार असल्याचे राज्यपालांना कळविले. बॅक वॉटरमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी विश्वदर्शन केले, स्वतःला फासावर लटकवून घेतले या सगळ्यासाठी राज्य सरकार जबाबदार आहे. सरकार संवेदनाहीन झालेले आहे. याबाबत राज्यपालांना निवेदन दिले. राज्यपालांनी सरकारला याबाबत सूचना करण्याचे मान्य केले.
आमदारांनी कायदा सुव्यवस्था बिघडवली - महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार गुन्हे करत आहेत आणि सरकार त्याला पाठीशी घालत आहे. सदा सर्वणकर यांनी हवेत गोळीबार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला मात्र त्यांना अद्यापही अटक नाही. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचे आमदार गुंडागिरी करत आहेत, मात्र सरकार त्यांना संरक्षण देत आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदारच कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवत आहेत, याबाबतही राज्यपालांना अवगत केले आहे. असेही दानवे यांनी यावेळी सांगितले.