मुंबई- शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांची ईडीकडून ( Sanjay Raut on ED probe ) चौकशी होत आहे. दुसरीकडे शिंदे गटातील नेते व आमदार सातत्याने संजय राऊत यांच्यावर टीका करत आहेत. अशा परिस्थितीतही संजय राऊत रोज माध्यमांसमोर शिवसेनेचे भूमिका मांडत आहेत. त्यांनी ट्विट करत ( Sanjay Raut tweet ) आपण कशालाही घाबरत नसल्याचे सूचित केले आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे, मनुष्य का हमेशा डर के माध्यम से ही शोषण किया जाता है ! __ ओशो जो डर गया वो मर गया. जय महाराष्ट्र!
-
मनुष्य का हमेशा
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
डर के माध्यम से ही
शोषण किया जाता है !
__ ओशो
जो डर गया वो मर गया.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/7R1PWnUrxL
">मनुष्य का हमेशा
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 21, 2022
डर के माध्यम से ही
शोषण किया जाता है !
__ ओशो
जो डर गया वो मर गया.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/7R1PWnUrxLमनुष्य का हमेशा
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 21, 2022
डर के माध्यम से ही
शोषण किया जाता है !
__ ओशो
जो डर गया वो मर गया.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/7R1PWnUrxL
शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ED probe ) यांना 21 जुलै ) पुन्हा 27 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावलं ( ED Summons Sena MP Sanjay Raut ) आहे. संजय राऊत यांना बुधवारी ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याकरिता समन्स बजावले होते. मात्र, संजय राऊत संसद सुरु असल्याने दिल्लीत आहेत. त्यामुळे त्यांनी 8 ऑगस्टपर्यंत वेळ मागितला होता. मात्र, ईडीने त्यांची विनंती फेटाळून लावली आहे. तसेच, 27 जुलैला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या कथित घोटाळ्यात संजय राऊत यांची १ जुलै रोजीही १० तास चौकशी करण्यात आली होती. 'केंद्राची तपासयंत्रणा आहे, सहकार्य केलं, त्यांच्या मनात काही शंका असतील तर आमच्या सारख्या लोकांनी दूर केल्या पाहिजेत, माझ्याकडून पूर्ण सहकार्य केलेलं आहे,' अशी प्रतिक्रिया या चौकशीनंतर राऊत यांनी दिली होती. त्यानंतर 19 जुलैला समन्स बजावत 20 जुलैला हजर राहण्यासाठी सांगितलं होते. मात्र, संसदेच पावसाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे ते हजर राहिले नाही. दरम्यान, राऊतांनी चौकशीसाठी 7 ऑगस्टपर्यंत वेळ मागितला होता. ईडीने सदर विनंती फेटाळून लावली. त्यानंतर ईडीने संजय राऊतांना समन्स पाठवत 27 जुलै रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगितलं आहे.
शिंदे गटाकडून गुवाहाटीत बोलाविणे आले होते- शिवसेनेत बंड झाल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे ( Shivsena Party crisis ) मोठे संकट निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकनिष्ठ असल्याचे दाखवून देणारे ट्विट शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut on party loyalty ) यांनी केले आहे. ईडीने त्यांना आज हजर राहण्याचे समन्स बजाविले आहे. यापूर्वी आपल्याला शिंदे गटाकडून गुवाहाटीत बोलाविणे आले होते, असाही त्यांनी गौप्यस्फोट केला होता. शिवसेनेने शिंदे गट आणि शिंदे सरकार स्थापनेला आव्हान दिलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. ईडीपुढे झुकणार नाही, असे यापूर्वी अनेकदा संजय राऊत ( ED Probe of Sanjay Raut ) यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातात हात घेत चालत असलेला फोटो ट्विट केला होता.
शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री असल्याची नुकतेच केली टीका- कोणत्याही लढाईसाठी दोन हात करण्याची ( Shivsena Leader Sanjay Raut ) तयारी आहे. छुपे वार सुरू आहेत. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे प्रयत्न आहे. शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री, त्यांचे दौरे होणारच अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्रात पूरस्थिती गंभीर झालेली आहे. अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र दिल्लीमध्ये आपले सरकार वाचविण्यासाठी आले आहेत. दिल्लीत ते निवडणूक आयोगाकडे जातील, आणखी कुठे कुठे जातील. कारण ते आता भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत. ते शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, अशी टिकाही संजय राऊत यांनी केली.
पत्राचाळ कथित घोटाळ्याप्रकरणी समन्स- शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुन्हा ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत यांना पुन्हा ईडीकडून समन्स पाठवण्यात आले आहे. यापूर्वी देखील संजय राऊत यांची आठ तास चौकशी करण्यात आली होती. संजय राऊत यांना आज ( 20 जुलै ) चौकशीला हजर राहण्याचे निर्देश ईडीने समन्समधून देण्यात आले आहे. शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांना पुन्हा ईडीने चौकशीकरिता बुधवारी (20 जुलै) मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावलं आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ कथित घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले आहे. यापूर्वी 7 जुलै रोजी 10 तास संजय राऊत यांची चौकशी करण्यात आली होती.
हेही वाचा-CA Topper Meenal Lahoti : सीएच्या परिक्षेत अमरावतीकर 'मीनल लाहोटी' देशात चौथी!