ETV Bharat / city

Sanjay Raut Criticized BJP : 'ईडी, सीबीआयमार्फत भाजपा कदाचित मॅजिक फिगर गाठू शकतील' - संजय राऊत यांची टीका

भाजपाला ( BJP ) मात्र ईडी, सीबीआयच्या अधिकाऱ्यांमार्फत मॅजिक फिगर ( Magic figure by ED CBI officials ) गाठायची असेल, असा खोचक टोला शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांनी भाजपाला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल केला. त्यावेळी ते बोलत होते.

Sanjay Raut Criticized BJP
Sanjay Raut Criticized BJP
author img

By

Published : May 30, 2022, 3:42 PM IST

Updated : May 30, 2022, 3:57 PM IST

मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाने धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवून चुरस वाढवली आहे. महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ आहे. भाजपाला ( BJP ) मात्र ईडी, सीबीआयच्या अधिकाऱ्यांमार्फत मॅजिक फिगर ( Magic figure by ED CBI officials ) गाठायची असेल, असा खोचक टोला शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांनी भाजपाला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल केला. त्यावेळी ते बोलत होते.

प्रतिक्रिया देताना संजय राऊत

राज्यसभेच्या रिक्त सहा जागांकरिता, सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेचे दोन, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एक आणि भाजपाने तीन उमेदवार दिले आहेत. निवडणूक अटीतटीची होणार आहे. परंतु, शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजय होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. आम्हाला कोणाचेही आव्हान नाही. विजयासाठी जेवढी मत हवीत, तेवढ्या मतांचा कोटा आहे. अपक्ष उमेदवारही सोबत आहेत. त्यामुळे आमचा विजय पक्का आहे, असेही राऊत म्हणाले.

'जिंकण्यासाठी भाजपा कोणत्याही थराला जाईल' : भाजपाला स्वतःचा उमेदवार निवडणुकीत आणायचा होता. छत्रपतींना यामुळे डावलण्यात आले. प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. मात्र भाजपाला घोडेबाजार करून निवडणूक लढवायची आहे. असे झाल्यास राज्य सरकारच्या गृह खात्याचे यावर संपूर्ण लक्ष असणार आहे, असेही राऊत म्हणाले. तसेच भाजपाकडे पुरेसे संख्याबळ नाही. मात्र मॅजिक फिगर गाठण्यासाठी ईडी, सीबीआयच्या अधिकाऱ्यांचा वापर होऊ शकते. जिंकण्यासाठी भाजपा कोणत्याही थराला जाईल, असा टोलाही राऊत यांनी लगावला. विश्वासघाताची करण्याची परंपरा भाजपाची आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये संपूर्ण जगाने पाहिला. त्यामुळे भाजपाने आम्हाला शिकवू नये, असा चिमटा राऊत यांनी काढला. २०१९ मधील वचपा काढण्याची संधी आयती चालून आल्याचे विधान मंत्री पियुष गोयल यांनी केले. या वक्तव्याचाही राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. भाजपाने आत्तापर्यंत महाराष्ट्रात बदल्याच्या भावनेतून काम केले आहे. तसेच, गोयल दिल्लीला असतात, त्यामुळे त्यांना येथील काही माहीत नसल्याचेही राऊत म्हणाले.

हेही वाचा - आमचे तीन आणि त्यांचे तीन उमेदवार ठरले तर घोडेबाजार होणारच नाही - देवेंद्र फडणवीस

Last Updated : May 30, 2022, 3:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.