ETV Bharat / city

Aaditya Thackeray on Eknath Shinde : 'राष्ट्रवादी आणि काँग्रेसने फसवले असते वाईट वाटले नसते, पण प्रियजनांनी फसवले'; आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला

author img

By

Published : Jun 24, 2022, 6:21 PM IST

पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना भवनातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला हजेरी लावली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टोलेबाजी ( eknath shinde ) केली. स्वत:ची किंमत लावून तिथे गेलेल्यांची किंमत काय लावायची?, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले. ( Aaditya Thackeray on Eknath Shinde )

Aaditya Thackeray on Eknath Shinde
आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला

मुंबई - पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना भवनातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला हजेरी लावली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टोलेबाजी ( eknath shinde ) केली. स्वत:ची किंमत लावून तिथे गेलेल्यांची किंमत काय लावायची?, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले. सत्ता येत-जात राहते, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात जे काम केले त्याला जनता कधीच विसरणार नाही. मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्रात अखंडता आणि शांतता राखणारी व्यक्ती. आता अशा परिस्थितीत कोणी त्यांची फसवणूक केली तर वाईट वाटते. त्यांना कोविड झालेला असताना सोडून जाणे हे त्यांना पटणारे आहे का? असा भावनिक प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. ( Aaditya Thackeray on Eknath Shinde )

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी आम्ही शासकीय निवासस्थान वर्षा सोडले. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येक कर्मचार्‍यांच्या शिवसैनिकाच्या डोळ्यात अश्रू होते. रस्त्यावर उभ्या असलेल्या शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यावेळी माझी आई रश्मी ठाकरे म्हणाल्या की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आमची फसवणूक केली असती तर फार वाईट वाटले नसते, पण प्रियजनांनी फसवले, ज्यांना आम्ही मोठे केले त्यांनी फसवले. हे वाईट आहे.

कोविड काळाचा फायदा घेऊन फसवणूक - कोविड काळात मुख्यमंत्र्यांना लोकांना भेटता आले नाही, हे साहजिक आहे, त्याचा फायदा या लोकांनी घेतला. एवढे होऊनही मुख्यमंत्री कृष्णाने भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणेच म्हणाले की, कुणाला अडवू नका, ज्याला जायचे आहे त्याला जाऊ द्या. जे जाणार आहेत त्यांना थोडे दिवस थोडेफार मिळेल. प्रत्येकजण किंमत टॅग देऊन निघून गेला. जे आमच्या पाठीशी उभे राहिले ते आमचे आहेत, जे समोर उभे राहिले ते त्यांचे आहेत. असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले असे आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.

महाराष्ट्रात राजकीय गोंधळ सुरूच - महाराष्ट्रात राजकीय गोंधळ सुरूच आहे. गुवाहाटीत सध्या शिवसेनेचे 40 आणि 12 अपक्ष आमदार असल्याचा दावा बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांच्याकडे सध्या 52 आमदार आहेत. ज्यांची संख्या आणखी वाढू शकते. बंडखोरांवर कारवाई करताना शिंदे यांच्यासह १६ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची याचिका शिवसेनेने केली आहे.

हेही वाचा - आता लढायचे आणि जिंकायचेच; शिवसेना भवनात आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंवर टोलेबाजी

हेही वाचा - शिवसेनेचे पारडे आकड्यांच्या जिवावर जड, शिंदे गटाला फटका बसण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.