ETV Bharat / city

राम मंदिर उभारणीसाठी शिवसेनेकडून एक कोटींचा निधी, अनिल देसाईंची माहिती - अयोध्या न्यूज

अयोध्या राम मंदिर निर्माण ट्रस्टला 1 कोटी रुपये देण्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली होती. त्याप्रमाणे 1 कोटी रुपयांचा निधी श्री राम जन्मभूमी क्षेत्र अयोध्या या नावाने स्टेट बँकेत जमा करण्यात आला आहे.

Shiv Sena collects Rs 1 crore for construction of Ram temple
राम मंदिर उभारणीसाठी शिवसेनेचे 1 कोटी जमा
author img

By

Published : Aug 2, 2020, 8:41 PM IST

मुंबई - अयोध्या राम मंदिर निर्माण ट्रस्टला 1 कोटी रुपये देण्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली होती. त्याप्रमाणे 1 कोटी रुपयांचा निधी श्री राम जन्मभूमी क्षेत्र अयोध्या या नावाने स्टेट बँकेत जमा करण्यात आला आहे. ती रक्कम मिळाल्याची खात्री ट्रस्टचे प्रमुख अनिल मिश्रा व खजिनदार महंत चंपतराय यांनी शिवसेना सचिव अनिल देसाई यांना फोन करून दिली होती.

शिवसेनेकडून एक रुपयाही निधी मिळाला नसल्याचे राममंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी म्हटले होते. त्यावर शिवसेनेचे नेते व सचिव अनिल देसाई यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मंदिर निर्मितीसाठी जे ट्रस्ट स्थापन झाले आहे, त्याचे महंत नृत्य गोपाल दास अध्यक्ष आहेत. सत्ता स्थापनेच्या 100 दिवसानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अयोध्येत श्री रामाचे दर्शन घेतले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेकडून राम मंदिर उभारणीसाठी 1 कोटी रुपये निधी देण्यात येईल, अशी घोषणा केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.