मुंबई शिवसेना आणि दसरा मेळावा Dussehra Gathering हे एक अतुट समीकरण आहे. मात्र, यंदाची परिस्थीती पूर्णपणे वेगळी आहे. महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ Maharashtra Politics झाली आहे. अशातच, शिवसेनेने खबरदारीचा उपाय म्हणून मेळाव्याला अनुमतीसाठी अर्ज केला. मात्र, महापालिकेने अद्याप अर्जावर निर्णय घेतला नसल्याची माहिती आहे. खुद्द उद्धव ठाकरे Uddhav Thackrey यांनी महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल Commissioner Iqbal Singh Chahal यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, अद्यापही शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी अनुमती Permission for Dussehra Gathering मिळाली नाही, असे सूत्रांकडून समजते.
शिवाजी पार्कवर कोण भाषण करणार शिंदे कि उद्धव ठाकरे राज्यातील लाखो शिवसैनिक विचारांचं सोनं लुटण्यासाठी दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर Shivaji Park Mumbai येतात. भाजप सोबत हात मिळवणी करून शिवसेनेमध्ये खिंडार पाडून शिंदे गटाने Shinde Group सत्ता स्थापन केली. शिवसेनेतील 40 आमदार आपल्याकडे आणल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Cm Eknath Shinde यांनी शिवसेना आमचीच हा दावा देखील केला.सर्वोच्च न्यायालयामध्ये हा दावा प्रलंबित suit is pending in the Supreme Court आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि शिवसेनेची प्रत्येक हालचाल अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अशातच, दसरा मेळावाही ताब्यात घेण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे का, अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तूळात Maharashtra Politics रंगली आहे.