मुंबई : शिवसेनेत दोन सख्य्या भावांमध्ये भांडण लावून भाजपा फायदा घेत आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा दादर शिवाजी पार्क ( Dussehra gathering of Shiv Sena Dadar Shivaji Park ) येथे होऊ नये यासाठी शिंदे गट आणि भाजपाने रडीचा डाव खेळला आहे. आम्ही वाद होऊ नये यासाठी सामंजस्याची भूमिका घेवून कोर्टात गेलो आहोत. आम्हाला कोर्टातून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. कोर्टाच्या निर्णयाचे आणि उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे आम्ही पालन करू असे मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.
रडीचा डाव खेळले : शिवसेनेत दोन सख्खे भाऊ भांडत आहेत याचा फायदा भाजपा घेत आहे आणि पुढेही घेणार आहे. शिंदे गट आणि भाजपा रडीचा डाव खेळलेले आहेत. बीकेसी मैदानात परवानगी मिळाली असताना आम्हाला परवानगी मिळू नये म्हणून बनावट कंपनी मध्ये आणून आम्हाला परवानगी देण्यात आली नाही. भाजपाला काहीही साध्य करता येत नसल्याने त्यांनी घरात दुही माजवली. यांना भाजपा जे स्क्रिप्ट देत आहेत ते ती वाचत आहेत. पालिकेने आणि पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आम्ही कोर्टात गेलो आहोत कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल. संयमी नेतृत्व उद्धव ठाकरे जो आदेश आम्हाला देतील त्याचे आम्ही पालन करू असे पेडणेकर म्हणाल्या.
राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न : महापालिकेला रडीचा डाव आणि कळीचा डाव खेळून या लोकांनी पालिकेला अडचणीत टाकले आहे. प्रभादेवीचा राडा मुद्दामून घडवून आणला होता. हा राडा घडवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात होता हे आम्हाला माहीत होत. मुद्दाम शिवसैनिकांना उकसवण्याचे काम केले जात होते. राज्यात राष्ट्रपती राजवट लावून आपले मुंबई आणि महाराष्ट्रातील मनसुभे साध्य करून घ्यायचे आहेत असा टोला पेडणेकर यांनी लगावला आहे.