ETV Bharat / city

Shinde Fadnavis Gov floor test : शिंदे फडणवीस सरकारची आज बहुमत चाचणी , जाणून घ्या महत्त्वाचे १२ मुद्दे - Mahavikas Aghadi

महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) सरकारला सत्तेपासून खाली ( Down from power )खेचून राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदे यांचे सरकार स्थापन झाले आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये शिंदे गट तसेच भाजप यांच्या आमदारांची संख्या 164 आहे. भाजपचे दोन आमदार मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप हे आजारी असल्याने उपस्थित राहू शकले नाही. भाजप-शिंदेगटकडे सध्या 166 आमदारांचा आकडा आहे.

Shinde Fadnavis  Maharashtra govt
शिंदे फडणवीस सरकार
author img

By

Published : Jul 4, 2022, 7:40 AM IST

Updated : Jul 4, 2022, 8:41 AM IST

मुंबई - शिंदे-फडणवीस सरकार हे आज बहुमताच्या चाचणीला सामोरे जात आहे. भाजपचे राहुल नार्वेकर हे निवडणूक जिंकून विधानसभा अध्यक्ष झाल्याने सरकार पहिल्या कसोटीत पास झाले आहे. आज सरकार बहुमताच्या चाचणीला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्युहरचना केली आहे. असे असले तरी वेगाने घडामोडी पाहता सरकारची दुसऱ्या दिवशीही कसोटीच लागणार आहे. तर पाहू, बहुमत चाचणीपूर्वी सरकार कोणत्या आव्हानांचा सामना करत आहे?

१) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला मोठा धक्का- राज्यात नाट्यमय सत्तांतर झाल्यानंतर खरी शिवसेना कुठली? उद्धव ठाकरे यांची की, एकनाथ शिंदे यांची, यावरून राज्यभर राजकीय चर्चांना उधाण आले होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे ( Ajay Chaudhary removed as legislative party leader ) यांच्या शिवसेनेकडून प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी करून सुद्धा बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात ( Sunil Prabhu removed as chief whip post ) जाऊन भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केले. यावरून सुद्धा त्यांच्यावर कुठली कारवाई होणार? यावर चर्चा रंगली असताना आता विधानमंडळ सचिवांनी शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे ( Eknath shinde shivsena legislative party leader ), तर प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती ( Bharat Gogavale shivsena chief whip ) करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला मोठा धक्का दिला आहे. तसे पत्र त्यांनी एकनाथ शिंदे व भरत गोगावले यांना दिले आहे.

२) मतदानाबाबत सावधगिरी बाळगा-शिवसेनेचे बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट तसेच भाजपने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीचा त्यांचा पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे. पण, शिंदे-फडणवीस सरकारला बहुमत चाचणीचा दुसरा महत्त्वाचा टप्पा पार करावा लागणार आहे. याबाबत आज शिंदे गटाच्या आमदारांची तसेच भाजपच्या आमदारांची संयुक्त बैठक मुंबईतील ताज प्रेसिडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी संबोधित केले.

३) बेसावध राहू नका, चूक करू नका? विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये शिंदे गट तसेच भाजप यांच्या आमदारांची संख्या 164 आहे. भाजपचे दोन आमदार मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप हे आजारी असल्याने उपस्थित राहू शकले नाही. भाजप-शिंदेगटकडे सध्या 166 आमदारांचा आकडा आहे. आजारी असलेले दोन्ही आमदार उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईत येण्याची शक्यता आहे. मात्र, बहुमतासाठी जो आकडा पाहिजे त्याच्यापेक्षा शिंदे- भाजपगटाचे संख्याबळ जास्त आहे. उद्या कशा पद्धतीने मतदानाला सामोरे जायचे या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी युतीच्या सर्व आमदारांना मार्गदर्शन केले. मतदानाबाबत सावधगिरी बाळगण्याचा इशाराही देवेंद्र फडवणीस यांनी सर्व आमदारांना दिला आहे.

४) बंडखोर आमदारांचे निलंबन करा-विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ( Assembly Speaker Election ) पार पडली आहे. राहुल नार्वेकर विधानसभेचे नवे अध्यक्ष ( Rahul Narwekar Assembly Speaker ) झाले आहेत. मात्र, या निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं आमदारांना व्हीप बजावला होता. तो व्हीप मोडल्यामुळे 39 सदस्यांना निलंबीत करण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे. याबद्दल भास्कर जाधव म्हणाले की, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी अखेर आज ( 3 जुलै ) विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान केले आहे. याबद्दल शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार देऊन अध्यक्षांना सांगितले की हे सर्व माझ्या समोर घडले आहे, असे जाधव यांनी म्हटलं आहे.

५) शरद पवारांचे मध्यावधी निवडणुकीचे संकेत-महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) सरकारला सत्तेपासून खाली ( Down from power )खेचून राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदे यांचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, हे सरकार सहा महिन्यांमध्ये कोसळेल. त्यामुळे सर्व आमदार आणि नेत्यांनी मध्यवर्ती निवडणुकीच्या तयारीला ( Prepare for Midterm Elections ) लागा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि आमदारांना दिल्या आहेत. शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आणि आमदारांची यशवंतराव चव्हाण सेंटर ( Meeting at Yashwantrao Chavan Center ) येथे सायंकाळी बैठक ( NCP meeting ) बोलावली होती. या बैठकीतून त्यांनी आपल्या नेत्यांना आणि आमदारांना या सूचना दिल्या आहेत.

६) विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर-विधानसभा अध्यक्षपदाची (Assembly Speaker) पहिली लढाई भाजप व शिंदे गटाने जिंकली. भाजप व शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) 164 मते मिळवत जिंकले. तर, मविआच्या राजन साळवींनी 107 मते मिळाली विधान परिषदत निवडणुकीत शिवसेनेला मतदान करणाऱ्या एमआयएमनेही मविआच्या उमेदवाराकडे पाठ फिरवली. सपा आणि एमआयएमचे मिळून तिघे आमदार तटस्थ राहीले. शिवसेनेचे आमदार आणि बंडखोर शिवसेना आमदारांत सभागृहात वाद होण्याची शक्यता होती पण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली.

७) विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात आक्षेप : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडी संदर्भामध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे राज्यपाल महोदयांनाही माहिती आहे. महाविकास आघाडी सरकार असताना विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी राज्यपालांनी परवानगी द्यावी म्हणून महाविकास आघाडी विशेष करून काँग्रेस वारंवार मागणी करीत होती. त्या संदर्भातील पत्रही त्यांनी राज्यपालांना दिला होते. परंतु, राज्यपालांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याकारणाने विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेता येत नाही अशा आशयाचे पत्र ( Letter to the Principal Secretary ) महाविकास आघाडी सरकारला दिलं होतं. आता त्याच पत्राचा आधार घेत महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

८) शिवसेनेचे विधीमंडळातील कार्यालय बंद-एकनाथ शिंदे गट ( Eknath Shinde Group ) आणि शिवसेनेमध्ये शह-काटशहचे राजकारण सुरू झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने आज शिवसेनेचे विधिमंडळ कार्यालय बंद केले. एकनाथ शिंदे गटाकडून विधिमंडळ सचिवांना याबाबतचे पत्र देण्यात आले होते. त्यानंतर विधान भवनात दुसऱ्या मजल्यावर असलेले शिवसेनेचे विधिमंडळ पक्ष कार्यालय बंद करण्यात आले आहे. शिवसेनेचे पक्ष कार्यालय बंद करून मूळ शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाने धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

९) बहुमताचा आकडा आहे १२५ - विधानसभा निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपचे संयुक्त उमेदवार राहुल नार्वेकर यांना एकूण 164 मते मिळाली. तर उद्धव गटाचे उमेदवार राहुल साळवे यांच्या बाजूने केवळ 107 मते पडली. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारला स्पष्ट बहुमत असल्याचे चित्र आहे. विधानसभेची एकूण सदस्य संख्या २८८ असून, त्यापैकी एका आमदाराचे निधन झाले आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या 39 बंडखोर सदस्यांना काढून टाकल्यानंतर एकूण सदस्य संख्या 248 आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा 125 आहे.

१०) उद्धव ठाकरे गटाला बहुमताचा आकडा गाठणे कठीण- एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेकडील आमदारांची संख्या कमी झाले आहे. सत्ता गमाविली असताना बहुमत चाचणीत उद्धव ठाकरे गटासमोर मोठे आव्हान आहे. सपा, एआयएमआयएम आणि सीपीएमचे आमदार आणि तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक व मतदानात सहभागी न होणार्‍या पक्षांनी ठाकरे गटाच्या बाजूने मतदान केले तरी त्यांची संख्या १२५ पर्यंत पोहोचणार नाही.

११) शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे तर प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती -शनिवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी करून सुद्धा बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केले. यावरून सुद्धा त्यांच्यावर कुठली कारवाई होणार यावर चर्चा रंगली असताना आता विधानमंडळ सचिवांनी शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे तर प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे. तसे पत्र त्यांनी एकनाथ शिंदे व भरत गोगावले यांना दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला मोठा धक्का दिला आहे.

१२) व्हिप न पाळल्यास शिवसेनेच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार- 16 आमदार असलेल्या उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, कारण सोमवारी होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावासाठी गोगावले यांनी जारी केलेला व्हीप त्यांना बंधनकारक असणार आहे. या 16 आमदारांनी व्हिप पाळण्यास नकार दिल्यास त्यांना अपात्रतेला सामोरे जावे लागू शकते. या १६ आमदारांवर कारवाई करण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना असणार आहे. या निर्णयाच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून न्यायालयामध्ये दाद मागितली जाणार आहे. विशेष म्हणजे, आज होणाऱ्या बहुमत चाचणी दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे १६ आमदार काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे

हेही वाचा-Vidhan Sabha Floor Test : उद्या विधानसभेत होणाऱ्या बहुमत चाचणी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

हेही वाचा-Sharad Pawar on Elections : सरकार सहा महिन्यांत कोसळेल; मध्यवर्ती निवडणुकीला तयार रहा - शरद पवार

हेही वाचा-Sawant on Rebal MLA : व्हीप झुगारणाऱ्या आमदारांवर कारवाई करा, शिवसेनेची अध्यक्षांकडे मागणी

Last Updated : Jul 4, 2022, 8:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.