ETV Bharat / city

Sheena Bora Murder Case : शीना बोरा हत्याकांड : इंद्राणी मुखर्जीची आज होणार सुटका..

शीना बोरा हत्याकांडातील ( Sheena Bora Murder Case ) मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन देण्यात ( Indrani Mukherjee granted bail by Supreme Court) आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर 'त्या' विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. इंद्राणी मुखर्जी 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. तिची आज तुरुंगातून सुटका होणार आहे.

Sheena Bora Murder Case
इंद्राणी मुखर्जी सर्वोच्च न्यायालयातून जामीन
author img

By

Published : May 18, 2022, 11:52 AM IST

Updated : May 20, 2022, 8:35 AM IST

मुंबई/नवी दिल्ली - शीना बोरा हत्याकांडातील ( Sheena Bora Murder Case ) मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी सर्वोच्च न्यायालयातून जामीन देण्यात ( Indrani Mukherjee granted bail by Supreme Court) आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर 'त्या' विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. इंद्राणी मुखर्जी 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. तिची आज तुरुंगातून सुटका होणार आहे.

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सुप्रीम कोर्टाने बुधवारी इंद्राणी मुखर्जीला तिची मुलगी शीना बोरा हिच्या हत्येचा आरोप असलेल्या खटल्यात जामीन मंजूर केला आहे. 6.5 वर्षांपासून इंद्राणी मुखर्जी ह्या कोठडीत आहेत, हा खटला लवकर पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, बीआर गवई आणि एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने नोव्हेंबर 2021 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळल्याच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या विशेष रजा याचिकेवर हा आदेश दिला. खंडपीठाने नमूद केले की, हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे आणि ५०% साक्षीदार जरी फिर्यादीने सोडले तरी खटला लवकर संपण्याची शक्यता नाही. या प्रकरणातील सहआरोपी इंद्राणी मुखर्जीचा पती पीटर मुखर्जी याला यापूर्वी जामीन मंजूर करण्यात आला होता, असेही खंडपीठाला सांगण्यात आले. पतीसोबत कट रचून स्वतःच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप तिच्यावर आहे.

याचिकाकर्त्यातर्फे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी युक्तीवाद केला. एप्रिल २०१२ मध्ये मुंबई पोलिसांत शीना बोराचे अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुश्री इंद्राणीच्या ड्रायव्हरला, ज्याला दुसऱ्या एका प्रकरणात अटक करण्यात आली होती, त्याने बोराची हत्या केल्याची कबुली दिली आणि मुंबई पोलिसांना कळवले की तिची आई, सुश्री इंद्राणीचा या हत्येत सहभाग होता. सीबीआयने 2015 मध्ये तपास हाती घेतला. तिला अटक करण्यात आली आणि त्याचप्रमाणे तिचे पती पीटर मुखर्जी यांना मार्च 2020 मध्ये विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

कोण होती शीना बोरा? शीनाची हत्या का झाली? हे प्रकरण नेमके काय आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याआधी शीना बोरा कोण होती हे जाणून घेऊया. शीना बोरा ही टीव्ही इंडस्ट्रीमधील एक नावाजलेला चेहरा असलेल्या इंद्राणी मुखर्जी यांची मुलगी होती. इंद्राणी 'मीडिया टायकून' म्हणून ओळख असलेल्या पीटर मुखर्जी यांच्या पत्नी आहे. त्यामुळे शीना बोरा पीटर मुखर्जी यांची सावत्र मुलगी होती. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली.

शेना बोराचा फॉरेन्सिक रिपोर्ट काय म्हणतो?

एम्सच्या फॉरेन्सिक विभागानं तयार केलेल्या या अहवालानुसार 2015 साली तपासादरम्यान सापडलेला सापळा हा शीना बोराचाच असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. सीबीआयच्या चार्जशीटसोबत जोडलेला वैद्यकीय चाचणी अहवाल हा सापडलेल्या सापळ्याच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतरच तयार करण्यात आला आहे. उंची, वय, लिंग या सर्व बाबी तो सापळा शीना बोराचाच असल्याचं स्पष्ट करणाऱ्या होत्या. 23 वर्षीय शीना बोराची गळा आवळून हत्या करण्यात आली होती, असेही अहवालात नमूद केलं आहे. वेगवेगळ्या फॉरेन्सिक तज्ज्ञांचं मत, प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती, आरोपीचा कबुलीजबाब, पुरावे या सगळ्यांच्या आधारे शीना बोराची हत्या झाल्याचं सीबीआयनं स्पष्ट केले होते.

काय आहे प्रकरण - इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. ज्यात प्रथम तिला पतीपासून मुलगी झाली. तिचे नाव शीना बोरा होते. इंद्राणी मुखर्जीचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितले जाते. यामुळे इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली. शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती.

2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणी शिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार, शीनाच्या राहुलसोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिक वाद हत्येमागील संभाव्य कारण होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद होती.

हेही वाचा - शीना बोरा प्रकरणी राकेश मारियांचा देवेन भारतींवर खळबळजनक आरोप

Last Updated : May 20, 2022, 8:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.