मुंबई : खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसुली हानी करणाऱ्या करदात्यांविरोधात शासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मे. एस. एस. सर्व्हिसेस या प्रकरणाचा तपास करून सुमारे 90 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळा ( 90 crore GST scam ) प्रकरणातील मुख्य सूत्रधार शशांक वैद्य यांना अटक करण्यात आली असल्याचे वस्तू व सेवा कर विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. या कर चुकवेगिरी प्रकरणात या आर्थिक वर्षातील सलग दहावी अटक आहे. या कार्यवाहीतून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांना पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. ( Warning of Maharashtra GST Department )
महसूल बुडवणाऱ्यां विरोधात शासनाची मोहीम : शासनाचा महसूल बुडविणाऱ्या करदात्यांविरोधात सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मे. एस. एस. सर्व्हिसेस या प्रकरणाचा तपास करून सुमारे 90 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार शशांक वैद्य यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वस्तू व सेवा कर विभागाने दिली आहे. शशांक वैद्य यांनी मे. एस. एस. सर्व्हिसेससह अन्य पाच बोगस कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे 88 कोटी रुपयांची खोटी बीजके ( 88 crore invoices submitted ) जारी केली आहेत. त्यानुसार शासनाची सुमारे 16 कोटींची महसुली हानी ( Revenue loss of Rs 16 crore ) केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. या प्रकरणाचा तपास करताना शशांक वैद्य हे मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अशी असेल शिक्षा : या प्रकरणामध्ये वस्तू आणि सेवांचा पुरवठा न करता महाराष्ट्र वस्तू आणि सेवाकर अधिनियम 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन केले गेले आहे. त्यामुळे शशांक वैद्य यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरीसाठी बुधवारी अटक केली आहे. त्यांचा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असल्याने वस्तू व सेवाकर कायदा 2017 नुसार जेलची हवा खावी लागत आहे. या व्यक्तीस अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने 31 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बोगस बीजके सादर : या प्रकरणामध्ये वस्तू व सेवांच्या पुरवठ्याशिवाय 17 कोटी रुपयांची बनावट बीजके देऊन, 3.09 कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर त्यांच्या प्राप्तकर्त्यांना स्थानांतरित करून 3.09 कोटी रुपयांची बनावट वजावट मिळवून दिली आहे. तसेच करदाता मे. एस. एस. सर्व्हिसेसच्या मालक सायली परुळेकर या कोणताही व्यवसाय करीत नाहीत, असे तपासात लक्षात आले आहे.
हेही वाचा : Ajit Pawar on PM Statement : 'केंद्राने वेळेत जीएसटी दिल्यास चांगला उपयोग करता येईल'