ETV Bharat / city

पवारांचा यू टर्न..? आता म्हणतात ५४ आमदारांवर सरकार कसे बनवणार, सेनेची कोंडी - सोनिया गांधी

महाराष्ट्रातील सत्ता स्थापने संदर्भातील पेच अद्यापही कायम आहे. शिवेसना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येऊन महाराष्ट्राला नवे पर्यायी सरकार देतील असे वाटत असताना पवारांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे सत्ता स्थापनेचा संभ्रम कायम राहिला आहे. पवार सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर तरी सत्ता स्थापनेचा पेच सुटेल असा तर्क लावला जात होता. मात्र, शरद पवारांची आजची वक्तव्य सत्ता स्थापनेबाबत संभ्रम अधिक वाढवणारी ठरली आहेत.

शरद पवार
author img

By

Published : Nov 18, 2019, 9:38 PM IST

Updated : Nov 18, 2019, 11:22 PM IST

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्ता स्थापने संदर्भात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना सोबत चर्चा सुरू आहे. किमान समान कार्यक्रमावर एकमत झाल्यानंतर आम्ही पाच वर्ष टिकणारे सरकार बनवणार असल्याचे पवार यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यानंतर दोनच दिवसात पलटी मारत पवार यांनी सेनेसोबत किंवा सोनिया गांधींसोबत सत्ता स्थापनेबाबत व किमान समान कार्यक्रमाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यासोबतच केवळ ५४ आमदारांच्या बळावर सरकार बनवता येत नसल्याचे म्हणत महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता वाढवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

नागपूर येथे पवार यांनी काँग्रेस-सेना सोडून दुसऱ्या कोणाशीही चर्चा सुरू नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. महाशिवआघाडी सरकार स्थापन करेल आणि हे सरकार ५ वर्ष टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता नसल्याचा दावाही शरद पवार यांनी व्यक्त केला होता. त्यात त्यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन कॉमन मिनिमम प्रोग्रॅम तयार केला आहे, मी मुंबईला परत गेल्यानंतर तो आराखडा बघणार आहे... काही मुद्यावर चर्चा सुरू असून ते सोडवले जातील, राज्यात पुढील सरकार महाशिव आघाडी स्थापन करणार असल्याची माहितीही पवार यांनी दिली होती.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर पवार यांची बदललेली भूमिका -

  • २४ ऑक्टोबर - विधानसभा निकालानंतर पवार यांनी पत्रकार परिषद बोलवत विरोधकांना सन्मानाचे स्थान दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले व शिवसेनेसोबत न जाता सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याचे म्हटले.
  • २९ ऑक्टोबर - आमदार फुटीच्या भीतीने काँग्रेसने आपले सर्व आमदार जयपूरला हलविले.

  • ३० ऑक्टोबर - भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड. यामुळे देवेंद्र फडणवीस यांचेच नाव भाजपकडून पुन्हा मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करण्यात आले.
  • ३१ -ऑक्टोबर - शिवसेना मुख्यमंत्रीपदावर अडून.. कोणत्याही परिस्थितीत सत्तेचे समसमान वाटप आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळाल्याशिवाय सत्तास्थापणे संदर्भात बोलणी होणार नसल्याचे शिवसेनेकडून जाहीर.
  • ६ नोव्हेंबर - राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात होत असलेला विलंब व मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी सेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यावेळी सेनेची अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी योग्य असल्याचे म्हणत पवारांनी गुंता वाढला.
  • ८ - नोव्हेंबर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आपला कोकणचा दौरा सोडून मुंबईत दाखल. राजकीय घडामोडींना वेग.. पुन्हा मुख्यमंत्रीपदात रस नसल्याचे केले स्पष्ट.
  • ८ नोव्हेंबर - आरपीआय नेते रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. सेना-भाजपने सत्ता स्थापन करून स्थिर सरकार स्थापन करावे, असा सल्ला देत काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात बसणार असल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
  • ९ नोव्हेंबर - सेना आमदारांची हॉटेल रिट्रीटमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक. मुख्यमंत्रीपदाची एकमुखी मागणी.
  • ९ नोव्हेंबर - राज्यपालांकडून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण. ४८ तासांची मुदत. मात्र संख्याबळाची जुळवाजुळव न झाल्याने भाजपकडून सत्ता स्थापन करण्यास नकार.
  • ११ - नोव्हेंबर - राज्यपालांकडून दुसरा सर्वात मोठा पक्ष शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण. मात्र काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्र न आल्याने शिवसेना सत्ता स्थापन्यास असमर्थ. राज्यपाल कोश्यारींकडून मुदतवाढ देण्यास नकार.
  • १२ - नोव्हेंबर - राष्ट्रवादीला सत्ता स्थापन्याचे निमंत्रण. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची आमदारांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना त्यांनी मध्यावधी निवडणुका होणार नाही सांगत सत्ता स्थापनेबाबत सकारात्मक संकेत दिले.
  • १२ नोव्हेंबर - राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सोडविण्यासाठी व शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीतून मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल व वेणूगोपाल पवारांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल.
  • १२ नोव्हेंबर - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुपारी ३ वाजता राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केंद्राकडे केली. त्यानंतर सायंकाळी शरद पवार व अहमद पटेल यांची संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घेत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा करून किमान समान कार्यक्रम ठरवला जाईल.
  • १३ - नोव्हेंबर - राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांना सांगितले की, तिन्ही पक्षांनी एकत्र आल्याशिवाय सरकार बनवता येणार नाही. सरकार स्थापनेसंदर्भात सेना, राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये चर्चा सुरू असून फॉर्म्युला ठरवला जात आहे.
  • नवीन वर्षापूर्वी नवे सरकार राज्यात स्थापन होणार असल्याचे म्हणत अजित पवार यांनी सरकार स्थापण्यासंदर्भात घाई नसल्याचे संकेत दिले.
  • १५ नोव्हेंबर - सरकार आम्हीच स्थापन करणार, अन्.. ५ वर्षे चालवण्यासाठी प्रयत्नही करणार, शरद पवारांचे नागपुरात वक्तव्य
  • १७ नोव्हेंबर - महाशिवआघाडीबाबत अद्याप काही ठरलं नाही, पवार-सोनिया गांधी भेटीनंतर (१९ नोव्हेंबर) चित्र स्पष्ट होईल - अजित पवार
  • - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शेट्टींबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळही उपस्थित होते.
  • १७ नोव्हेंबर - जवळपास १४ ते १५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले. मात्र, मी त्यांची नावे आत्ताच जाहीर करणार नसल्याचे पाटील म्हणाले. तसेच येणाऱ्या काळात आम्ही मेगाभरती करणार नसून मेरीट भरती करणार असल्याचे ते म्हणाले.
  • राष्ट्रवादीच्या आमदारांची पुण्यात बैठक.

  • १८ नोव्हेंबर - संसदेत पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादीचे कौतुक.

सोनिया गांधीसोबत चर्चेनंतर शरद पवार यांनी काय म्हटलं?

- महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर चर्चा करण्यात आली. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का? सरकार स्थापन करायचं का? यावर कोणतीही चर्चा झालेली नाही.

- शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात सोनिया गांधी यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही.

- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या आघाडीबाबत किमान समान कार्यक्रमाबाबत कोणतीही चर्चा नाही.

- सत्तास्थापनेचं काय करायचं ते भाजप आणि शिवसेनेने विचार करावा.

- शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा पेच कायम असल्याचे दिसून येत आहे.

- दिल्लीत शरद पवार - सोनिया गांधी यांची भेट. भेटीनंतरच्या बैठकीत पवारांकडून घुमजाव. सरकार स्थापण्यासंदर्भात व किमान समान कार्यक्रमाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे व सरकार बनवणार नसल्याचे स्पष्ट.

एनसीपी अध्‍यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्‍यक्षा सोनिया गांधी यांची भेटीनंतर सांगितले, की आघाडीतील पक्षातील नेत्यांची मते विचारात घेतल्यानंतर महाराष्‍ट्रात सरकार बनविण्याबाबत निर्णय घेतला जाईल. निवडणुकीवेळी अनेक पक्ष आमच्या आघाडीत सामील होते. त्यांच्या हिताचा विचारही आम्हाला करावा लागेल. काँग्रेस-एनसीपीमध्ये किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली नाही.

पीएम मोदी द्वारे राज्यसभेत एनसीपीचे कौतुक करण्यासंदर्भात पवार म्हणाले, की मी इतक्या वर्षापासून संसद सदस्य आहे. परंतु केवळ विरोधासाठी कधीही वेलमध्ये उतरलो नाही. हीच आमच्या पक्षाची नीती आहे.

१-२ दिवसात दोन्ही पक्षांची दिल्लीत बैठक

दरम्यान काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पवार-सोनिया गांधी भेटीची माहिती ट्विट करून दिली आहे. त्यांनी लिहिले आहे, की शरद पवारांनी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली व महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. येत्या एक-दोन दिवसात राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक होईल. त्यानंतरच महाराष्ट्रातील सत्ता स्थापन करण्यासंदर्भातील निर्णय होईल.

Intro:Body:

पवारांचा यू टर्न..?  आता म्हणतात ५४ आमदारांवर सरकार कसे बनवणार, सेनेची कोंडी   

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्ता स्थापने संदर्भात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना सोबत चर्चा सुरू आहे. किमान समान कार्यक्रमावर एकमत झाल्यानंतर आम्ही पाच वर्षे टिकणारे सरकार बनवणार असल्याचे पवार यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यानंतर दोनच दिवसात पलटी मारत पवार यांनी सेनेसोबत किंवा सोनिया गांधींसोबत सत्ता स्थापनेबाबत व किमान समान कार्यक्रमाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यासोबतच केवळ ५४ आमदारांच्या बळावर सरकार बनवता येत नसल्याचे म्हणत महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता वाढवली आहे.

नागपूर येथे पवार यांनी काँग्रेस-सेना सोडून दुसऱ्या कोणाशीही चर्चा सुरू नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. महाशिवआघाडी सरकार स्थापन करेल आणि हे सरकार ५ वर्ष टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. राज्यात मध्यवती निवडणुकीची शक्यता नसल्याचा दावाही शरद पवार यांनी व्यक्त केला होता.  त्यात त्यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन कॉमन मिनिमम प्रोग्रॅम तयार केला आहे, मी मुंबईला परत गेल्यानंतर तो आराखडा बघणार आहे...काही मुद्यावर चर्चा सुरू असून ते सोडवले जातील, राज्यात पुढील सरकार महाशिव आघाडी स्थापन करणार असल्याची माहितीही पवार यांनी दिली होती.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर पवार यांची बदललेली भूमिका -

२४ ऑक्टोबर - विधानसभा निकालानंतर पवार यांनी पत्रकार परिषद बोलवत पवारांनी विरोधकांना सन्मानाचे स्थान दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले व शिवसेनेसोबत न जाता सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याचे म्हटले.

२९ ऑक्टोबर - आमदार फुटीच्या भीतीने काँग्रेसने आपले सर्व आमदार जयपूरला हलविले.

३० ऑक्टोबर - भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड. यामुळे देवेंद्र फडणवीस यांचेच नाव भाजपकडून पुन्हा मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करण्यात आले.

३१ -ऑक्टोबर - शिवसेना मुख्यमंत्रीपदावर अडून. कोणत्याही परिस्थितीत सत्तेचे समसमान वाटप व अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळाल्याशिवाय सत्तास्थापणे संदर्भात बोलणी होणार नसल्याचे शिवसेनेकडून जाहीर.

६ नोव्हेंबर - राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात होत असलेला विलंब व मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी सेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यावेळी सेनेची अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी योग्य असल्याचे म्हणत गुंता वाढला.

८ - नोव्हेंबर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आपला कोकणचा दौरा सोडून मुंबईत दाखल. राजकीय घडामोडींना वेग. पुन्हा मुख्यमंत्रीपदात रस नसल्याचे केले स्पष्ट.

८ नोव्हेंबर - आरपीआय नेते रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. सेना-भाजपने सत्ता स्थापन करून स्थिर सरकार स्थापन करावे, असा सल्ला देत काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात बसणार असल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

९ नोव्हेंबर - सेना आमदारांची हॉटेल रिट्रीटमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक. मुख्यमंत्रीपदाची एकमुखी मागणी.

९ नोव्हेंबर - राज्यपालांकडून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण. ४८ तासांची मुदत.  मात्र संख्याबळाची जुळवाजुळव न झाल्याने भाजपकडून सत्ता स्थापन करण्यास नकार.

११ - नोव्हेंबर - राज्यपालांकडून दुसरा सर्वात मोठा पक्ष शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण. मात्र काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्र न आल्याने शिवसेना सत्ता स्थापन्यास असमर्थ. राज्यपाल कोश्यारींकडून मुदतवाढ देण्यास नकार.

१२ - नोव्हेंबर - राष्ट्रवादीला सत्ता स्थापन्याचे निमंत्रण. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची आमदारांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना त्यांनी मध्यावधी निवडणुका होणार नाही सांगत सत्ता स्थापनेबाबत सकारात्मक संकेत दिले आहे.

१२ नोव्हेंबर - राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सोडविण्यासाठी व शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीतून मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल व वेणूगोपाल पवारांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल.

 १२ नोव्हेंबर - राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुपारी ३ वाजता राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केंद्राकडे केली. त्यानंतर सायंकाळी शरद पवार व अहमद पटेल यांची संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घेत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा करून किमान समान कार्यक्रम ठरवला जाईल.

१३ - नोव्हेंबर - राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाद मलिक यांनी पत्रकारांना सांगितले की, तिन्ही पक्षांनी एकत्र आल्याशिवाय सरकार बनवता येणार नाही. सरकार स्थापनेसंदर्भात सेना, राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये चर्चा सुरू असून फॉर्मूला ठरवला जात आहे.

- नवीन वर्षापूर्वी नवे सरकार राज्यात स्थापन होणार असल्याचे म्हणत अजित पवार यांनी सरकार स्थापण्यासंदर्भात घाई नसल्याचे संकेत दिले.

१५ नोव्हेंबर - सरकार आम्हीच स्थापन करणार, अन्.. ५ वर्षे चालवण्यासाठी प्रयत्नही करणार, शरद पवारांचे नागपुरात वक्तव्य

१७ नोव्हेंबर - महाशिवआघाडीबाबत अद्याप काही ठरलं नाही, पवार-सोनिया गांधी भेटीनंतर (१९ नोव्हेंबर) चित्र स्पष्ट होईल.- अजित पवार

- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शेट्टींबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळही उपस्थित होते.

१७ नोव्हेंबर - जवळपास १४ ते १५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले. मात्र, मी त्यांची नावे आत्ताच जाहीर करणार नसल्याचे पाटील म्हणाले. तसेच येणाऱ्या काळात आम्ही मेगाभरती करणार नसून मेरीट भरती करणार असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादीच्या आमदारांची पुण्यात बैठक.

१८ नोव्हेंबर - संसदेत पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादीचे कौतुक.

सोनिया गांधीसोबत चर्चेनंतर शरद पवार यांनी काय म्हटलं?

  - महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर चर्चा करण्यात आली. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का? सरकार स्थापन करायचं का? यावर कोणतीही चर्चा झालेली नाही.

   - शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात  सोनिया गांधी यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही

   - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या आघाडीबाबत किमान समान कार्यक्रमाबाबत कोणतीही चर्चा नाही

    - सत्तास्थापनेचं काय करायचं ते भाजप आणि शिवसेनेने विचार करावा -

- शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा पेच कायम असल्याचे दिसून येत आहे.

- दिल्लीत शरद पवार - सोनिया गांधीं भेट. भेटीनंतरच्या बैठकीत पवारांकडून घुमजाव. सरकार स्थापण्यासंदर्भात व किमान समान कार्यक्रमाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे व सरकार बनवणार नसल्याचे स्पष्ट.  

एनसीपी अध्‍यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्‍यक्षा सोनिया गांधी यांची भेटीनंतर सांगितले, की आघाडीतील पक्षातील नेत्यांची मते विचारात घेतल्यानंतर महाराष्‍ट्रात सरकार बनविण्याबाबत निर्णय घेतला जाईल. निवडणुकीवेळी अनेक पक्ष आमच्या आघाडीत सामील होते. त्यांच्या हिताचा विचारही आम्हाला करावा लागेल. काँग्रेस-एनसीपीमध्ये किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली नाही.

पीएम मोदी द्वारे राज्यसभेत एनसीपीचे कौतुक करण्यासंदर्भात पवार म्हणाले, की मी इतक्या वर्षापासून संसद सदस्य आहे. परंतु केवळ विरोधासाठी कधीही वेलमध्ये उतरलो नाही. हीच आमच्या पक्षाची नीती आहे.

१-२ दिवसात दोन्ही पक्षांची दिल्लीत बैठक

दरम्यान काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पवार-सोनिया गांधी भेटीची माहिती ट्विट करून दिली आहे. त्यांनी लिहिले आहे, की शरद पवारांनी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली व महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. येत्या एक-दोन दिवसात राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक होईल. त्यानंतरच महाराष्ट्रातील सत्ता स्थापन करण्यासंदर्भातील निर्णय होईल.

Conclusion:
Last Updated : Nov 18, 2019, 11:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.