ETV Bharat / city

Gram Panchayat Result : ग्रामपंचायतच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस यश- शरद पवार - Great Success Of Mahavikas Aghadi

राज्यात 17 जिल्ह्यातील 608 ग्रामपंचायतचे निकाल हाती आले आहेत. या निकालात ( Gram Panchayat Result ) आपलाच पक्ष पुढे कसा हे सातत्याने भारतीय जनता पक्ष सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट यांच्या युतीला ग्रामपंचायत सर्वात अधिक ग्रामपंचायत वर विजय झाला असल्याचा दावाही भाजप आणि एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) गटाकडून करण्यात येतोय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी सरकारी पक्षाचा हा दावा खोडून काढला असून ग्रामपंचायत महाविकास आघाडीला सर्वात जास्त जागा ( Great Success Of Mahavikas Aghadi ) मिळाल्या असल्याचा दावा केला आहे.

Sharad Pawar
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
author img

By

Published : Sep 21, 2022, 4:04 PM IST

मुंबई - राज्यात 17 जिल्ह्यातील 608 ग्रामपंचायतचे निकाल ( Gram Panchayat Result ) हाती आले आहेत. या निकालात आपलाच पक्ष पुढे कसा हे सातत्याने भारतीय जनता पक्ष सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट यांच्या युतीला ग्रामपंचायत सर्वात अधिक ग्रामपंचायत वर विजय झाला असल्याचा दावाही भाजप आणि एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) गटाकडून करण्यात येतोय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारी पक्षाचा हा दावा खोडून काढला असून ग्रामपंचायत महाविकास आघाडीला सर्वात जास्त जागा मिळाल्या ( Great Success Of Mahavikas Aghadi ) असल्याचा दावा केला आहे. या निकालांमध्ये महाविकास आघाडीला 277 तर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाला केवळ 210 जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने कौल दिला असल्याचा शरद पवार यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

दसरा मेळावाचा वाद सामंजस्याने सोडवावा - मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री असतात ते स्वतःही अनेक वेळा दसरा मेळाव्यात शिवाजी पार्क येथे उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून भूमिका घेताना त्यांची भूमिका ही सामंजस्याची असली पाहिजे. दसरा मेळावा बाबतची पहिली मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे या मागणीच्या निर्णयाला विलंब लावणे योग्य नाही. दसरा मेळाव्याचा प्रश्न सामंजस्याने सोडवावा असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांनी दिला आहे. तसेच राज्यातील जनता सध्या अडचणीत आहे त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून राज्याचे धोरण एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट करावे ते धोरण तातडीने अमलात आणले गेले पाहिजे यासाठी एकनाथ शिंदे यांनी काम केले पाहिजे असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

पंतप्रधानांनीच लॉकडाऊन जाहीर केला होता - पंतप्रधानांनी सणांवर बंधन आणली होती. राज्यामध्ये आमचे सरकार आल्यानंतर हिंदू सणांवरतील निर्बंध उठले असल्याचे सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र राज्यात आणि देशांमध्ये कोरोना फोफावत असताना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळच्या वेळेस देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यामुळे सण-उत्सव या सर्वांवरतीच निर्बंध आले होते. मात्र पंतप्रधानांनी त्यावेळेस घेतलेला निर्णय योग्य होता हे विसरून चालणार नाही असा टोला भारतीय जनता पक्षाला शरद पवार यांनी लगावला आहे.

आपला पक्ष वाढवण्याचा सर्वांना अधिकार - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, आपला पक्ष वाढवण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. याआधीही खुद्द पंतप्रधान यांनीही बारामतीचा दौरा केला होता. यावेळी बारामतीचा दौरा केल्यानंतर आपल्या ज्ञानात भर पडली असे वक्तव्य त्यांनी केले होते याची आठवण देखील शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून करून दिली. तसेच देशभरात 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी भारतीय जनता पक्ष संबंधित काम करण्याचा त्यांना अधिकार आहे. खास करून महाराष्ट्र, मध्य प्रदेश येथे सत्ता पालट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपली ताकद लावली होती. दिल्ली, पंजाब, झारखंड येथेही त्यांच्याकडून प्रयत्न करण्यात आला सध्या देशभरात भारतीय जनता पक्षासाठी चांगले वातावरण नाही. त्यामुळे भाजप केंद्रीय नेते आणि आपल्या ज्येष्ठ नेत्याच्या माध्यमातून देशभरात 2024 च्या निवडणुकीची तयारी करत आहे असा चिमटा ही शरद पवार यांनी काढला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.