मुंबई - देशातील युवा पिढीला अधिक तंत्रकुशल, रोजगाराभिमुख, सृजनशील व सशक्त बनवण्याचा निर्धार करूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने केले आहे. पवार यांनी एक ट्विट करून हे आवाहन केले आहे.
-
यंदा दहीहंडी उत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा उत्साह तरुणाईमध्ये दिसून येत आहे. आनंद आणि हर्षोल्हासाचे प्रतीक असलेला हा सण आपल्या सर्वांमध्ये नवी उमेद, सामाजिक भान जपण्याची प्रेरणा निर्माण करो ही सदिच्छा. सर्वांना #गोकुळाष्टमी व #दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. pic.twitter.com/pZiTqbSDi3
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">यंदा दहीहंडी उत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा उत्साह तरुणाईमध्ये दिसून येत आहे. आनंद आणि हर्षोल्हासाचे प्रतीक असलेला हा सण आपल्या सर्वांमध्ये नवी उमेद, सामाजिक भान जपण्याची प्रेरणा निर्माण करो ही सदिच्छा. सर्वांना #गोकुळाष्टमी व #दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. pic.twitter.com/pZiTqbSDi3
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 12, 2020यंदा दहीहंडी उत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा उत्साह तरुणाईमध्ये दिसून येत आहे. आनंद आणि हर्षोल्हासाचे प्रतीक असलेला हा सण आपल्या सर्वांमध्ये नवी उमेद, सामाजिक भान जपण्याची प्रेरणा निर्माण करो ही सदिच्छा. सर्वांना #गोकुळाष्टमी व #दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. pic.twitter.com/pZiTqbSDi3
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 12, 2020
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, " युवा पिढी ही देशाच्या विकासात मोलाची कामगिरी पार पाडत असते. युवावर्गाला रचनात्मक बळ दिल्यास त्यांच्या शक्तीची परिघ विकासाच्या नव्या परिसीमा गाठेल. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त देशातील युवा पिढीला अधिक तंत्रकुशल, रोजगाराभिमुख, सृजनशील व सशक्त बनवण्याचा निर्धार करूया."
याचप्रमाणे पवार यांनी गोकुळाष्टमी आणि दहीहंडीच्या निमित्ताने केलेल्या एका ट्विट मध्येही तरुणाईकडून या सण आणि उत्सवाच्या निमित्ताने राबवण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रम संदर्भात कौतुक केले आहे. तसेच हा उत्सव आपल्या सर्वांमध्ये नवी उमेद, सामाजिक भान जपण्याची प्रेरणा निर्माण करो अशी सदिच्छा पवार यांनी व्यक्त केली आहे.
ते ट्विट मध्ये म्हणतात की, "यंदा दहीहंडी उत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा उत्साह तरुणाईमध्ये दिसून येत आहे. आनंद आणि हर्षोल्हासाचे प्रतीक असलेला हा सण आपल्या सर्वांमध्ये नवी उमेद, सामाजिक भान जपण्याची प्रेरणा निर्माण करो"