ETV Bharat / city

Drugs Party Case : आपल्या नावावर अनेकांना पार्टीत बोलाविले - आर्यन खानचा दावा

author img

By

Published : Oct 3, 2021, 12:45 PM IST

Updated : Oct 3, 2021, 5:36 PM IST

अरबी समुद्रातील क्रुझ शिपवरील ड्रग्स पार्टीत ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. आर्यन खानसह एकूण आठ जणांची चौकशी एनसीबीकडून केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी एनसीबीने आर्यन खानसह चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विविध तपासण्या सुरू आहेत.

Cruise Drugs Party Case : NCB's big action, Shah Rukh's son Aryan Khan arrested
Cruise Drugs Party : एनसीबीची मोठी कारवाई, शाहरूखचा मुलगा आर्यन खानला अटक

मुंबई : अरबी समुद्रातील क्रुझ शिपवरील ड्रग्स पार्टीत ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. आर्यन खानसह एकूण आठ जणांची चौकशी एनसीबीकडून केली जात असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, एनसीबीकडून आर्यनच्या मोबाईलची तपासणी सध्या केली जात आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीबीने आर्यन खानसह चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विविध तपासण्या सुरू आहेत, अशी माहिती मिळाली आहे. तसेच याप्रकरणात आपल्या नावावर पार्टीत अनेकांना बोलाविण्यात आल्याचा दावा आर्यनने केला आहे. दुसरीकडे, आर्यनचे पिता शाहरूख खान दुबईत असल्याची माहिती मिळत आहे.

माझ्या नावे अनेकांना बोलाविले, आर्यनचा दावा

सूत्रांच्या माहितीनुसार, आपल्या नावावर पार्टीत अनेकांना बोलाविण्यात आल्याचा दावा आर्यनने केला आहे. पार्टीत काय होणार आहे याची माहिती त्याला नव्हती असे त्याने म्हटले आहे. दुसरीकडे एनसीबीचे अधिकारी आर्यनचा मोबाईल तपासत आहेत. त्याच्या मोबाईलमधील चॅटस् तपासले जात आहेत.

आर्यन खानसह चौकशी केली जात असल्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

1) मुनमुन धमेचा

2) नुपुर सारिका

3) इस्मित सिंह

4) मोहक जसवाल

5) विक्रांत छोकेर

6) गोमित चोप्रा

7) आर्यन खान

8) अरबाझ मर्चंट

आर्यन खानसह आठ जण ताब्यात

ड्रग्स पार्टी प्रकरणी एनसीबीने बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर सात जणांना ताब्यात घेतल्याची माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. एनसीबीने केलेल्या छापेमारीदरम्यान एमडीएमए, एक्स्टसी, कोकेन, एमडी (मेफेड्रोन) सारख्या विविध अमली पदार्थही जप्त करण्यात आल्याचे ते म्हणाले. या प्रकरणी ड्रग विरोधी एजन्सीने एफआयआर नोंदविल्याचेही ते म्हणाले. पार्टीत सहभागी झालेल्यांनी कपड्यांमध्ये, अंडरगर्मेंट्स आणि पर्समध्ये अमली पदार्थ लपवून ठेवले होते असे अधिकारी म्हणाले. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केले जाईल, असे एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले. आज सकाळी एनसीबीने येथील कार्यालयात अटकेत असलेल्यांची चौकशी केली, असे ते म्हणाले.

ताब्यात घेतलेल्यांची वैद्यकीय तपासणी

या प्रकरणी ताब्यात घेतलेल्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. वैद्यकीय चाचणीनंतर सर्वांना मुंबईतील किला कोर्टसमोर हजर केले जाईल. यावेळी एनसीबीकडून त्यांच्या रिमांडची मागणी केली जाऊ शकते.

आठ जण ताब्यात - एनसीबी प्रमुख एसएन प्रधान

या प्रकरणी आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती एनसीबीचे प्रमुख एस एन प्रधान यांनी एएनआयशी बोलातना दिली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील छापे टाकले जातील असे ते म्हणाले. आम्ही इनपुट गोळा करत होतो आणि जेव्हा चरस आणि एमडीएमसारखी औषधे वापरल्याची माहिती मिळाली तेव्हा आम्ही कारवाई केली. आम्ही निष्पक्षपणे वागत आहोत. प्रक्रियेत, जर बॉलिवूड किंवा श्रीमंत लोकांशी काही संबंध उदयास आले, तर ते असू द्या. आम्हाला कायद्याच्या कक्षेत काम करावे लागेल असेही ते म्हणाले.

मध्यरात्री कारवाई

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रुझ शिपवरील हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीवर एनसीबीने रात्रीच्या सुमारास कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहे. या कारवाईत तीन महिलांसह एकूण 13 जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात एका बॉलीवूड अभिनेत्याचा मुलाचाही समावेश असल्याचे समजते आहे. दरम्यान, एनसीबीने पार्टीच्या आयोजकांना हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका शिपमध्ये ड्रग्स पार्टी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनी प्रवासी बनून शिपमध्ये प्रवास केला आणि ही कारवाई केली.

दोन आठवड्यांपूर्वीच मिळाली माहिती

दोन आठवड्यांपूर्वीच एनसीबीला पार्टीची माहिती मिळाल्याचे समोर येत आहे. एनसीबीचे संचालक एस एन प्रधान यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. क्रूझवरील ड्रग्ज पार्टी बद्दल २ आठवड्यांपूर्वी आम्हाला माहिती मिळाली होती. यामध्ये बॉलीवूड लिंक समोर आली आहे. मात्र कोणीही आणि कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती या मध्ये गुंतलेला असो कारवाई केली जाईल, याबाबत पुढील आणखी माहिती काही दिवस घेतली जाईल. नशामुक्त भारत हे आमचे ध्येय आहे असे प्रधान म्हणाले.

हेही वाचा - अरबी समुद्रात क्रूझवर हायप्रोफाईल 'ड्रग्स पार्टी'; एनसीबीच्या धाडीत अमली पदार्थांसह 13 जण ताब्यात

Last Updated : Oct 3, 2021, 5:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.