ETV Bharat / city

मुंबई क्राईम ब्रांचकडून सेक्स टूरिझम रॅकेटचा भंडाफोड; दोन महिला अटेकत

author img

By

Published : Oct 20, 2021, 5:38 PM IST

Updated : Oct 20, 2021, 6:45 PM IST

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सेक्स टुरिझम रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने सापळा रचून ही कारवाई केली. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी दोन महिला दलालांना अटक केली, अशी माहिती मुंबई क्राईम ब्रांचचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी दिली.

sex tourism racket busted bycrime branch
मुंबई क्राईम ब्रांच सेक्स रॅकेट भंडाफोड

मुंबई - मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सेक्स टुरिझम रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने सापळा रचून ही कारवाई केली. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी दोन महिला दलालांना अटक केली, अशी माहिती मुंबई क्राईम ब्रांचचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी दिली.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा - Mumbai Cruise Drugs Case: यातील ९० टक्के प्रकरणे ही फेक सिद्ध होतील, मोदींनी याची माहिती घ्यावी- नवाब मलिक

रॅकेटमध्ये महिलांना वेश्या व्यवसायात काम करायला लावले जायचे. विशेष म्हणजे, यात महिला ग्राहकांसह भारतभर फिरण्यासाठी जायच्या. टूरवर कपल म्हणून अशा महिलांना ग्राहकांसोबत पाठवले जायचे. मुंबई क्राइम ब्रांचच्या यूनिट 7 ला अशी महिती मिळाली होती की, 2020 मध्ये वेश्या व्यवसायात अटक केलेली एक महिला आपल्या पार्टनरसह मिळून वेगळ्या प्रकारे रॅकेट चालवत आहे. यानंतर मुंबई एअरपोर्टवर क्राइम ब्रांचच्या टीमने ट्रॅप लावत दोन महिलांना अटक केली आणि अन्य दोन महिला ज्यांना या व्यवसायात ढकलले जात होते त्यांना ताब्यात घेत शेल्टर होममध्ये पाठवण्यात आले. या महिलांना देहविक्रीच्या दलदलीत ढकलणाऱ्या दोन्ही आरोपी महिलांविरुद्ध भादंवि कलम 370(2)(3) आणि r/w 4, 5 पिटा कायद्यान्वये (PITA Act) गुन्हा दाखल केला आहे.

..असा सुरू होता गोरखधंदा

ही लोक ग्राहक शोधायची. त्यांना ग्राहक मिळला आणि डील फायनल झाली की, महिलांसोबत भारतातील वेगवेगळ्या ठिकाणच्या पर्यटनस्थळांवर पोहोचवायचे. यात गोव्याला लोकांची सर्वाधिक पसंती होती. संबंधित रॅकेट चालवणारे लोक ग्राहकांना आधी मुलींचे फोटो पाठवायचे. मुलगी पसंत आल्यानंतर ग्राहकांना गोवा किंवा ठरलेल्या ठिकाणापर्यंत फ्लाईटचे स्वत:चे तिकीट बुक करावे लागायचे. हे लोक ग्राहकांकडून दोन दिवसांचे 50 हजार रुपये घ्यायचे, जे एक्स्क्लुझिव्ह सेक्ससाठी घेतले जायचे. अटक केलेले आरोपी त्या मुलींकडून 20 टक्के कमिशन घ्यायचे. ज्यानंतर ग्राहक त्याने पसंत केलेल्या मुलीला घेऊन दोन दिवसांसाठी गोव्याला जायचे आणि नंतर मुंबईत परतायचे.

कसे पकडले रॅकेट

क्राइम ब्रांचने या प्रकरणात दोन महिलांना अटक केली आहे. यातील एकीचे नाव आबरून अमजद खान उर्फ सारा तर, दुसरीचे नाव वर्षा दयालाल असे आहे. क्राईम ब्रांचने सांगितले की, ज्यावेळी याबाबत माहिती मिळाली त्यावेळी एक डुप्लिकेट ग्राहक तयार केला ज्याने महिलांशी संपर्क केला आणि त्यांचा विश्वास जिंकल्यानंतर मुलींची मागणी केली. त्यानंतर गोव्याची तिकिटे देखील बुक केली. यानंतर ज्यावेळी त्या महिला एअरपोर्टवर पोहोचल्या त्यावेळी पीएसआय स्वप्निल काळे आणि त्यांच्या टीमने तीन महिलांना अडवले आणि चौकशीनंतर ताब्यात घेतले. चौकशीनंतर माहिती मिळाली की, यांची चौथी साथीदार असलेल्या महिलेने बोर्डिंग पास घेतला आहे. त्यानंतर पीआय एम. श्रीधनकर आणि पीआय प्रिया थोरात सीआयएसएफ यांच्या मदतीने त्या महिलेला एअरपोर्टमधून बाहेर काढत ताब्यात घेतले. त्यावेळी तिने या प्रकरणाची कबुली दिली. त्या महिलेने सांगितले की, मुंबईत पोलिसांची छापेमारी खूप वाढली आहे, त्यामुळे मुलींना काम करायला भीती वाटते. त्यामुळे गोवा किंवा अन्य पर्यटनस्थळांवर फिरायला पाठवले जायचे, जेणेकरून कुणाला संशय येऊ नये.

हेही वाचा - आर्यन खानचा जामीन फेटाळला, आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला

Last Updated : Oct 20, 2021, 6:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.