मुंबई - विमान प्रवाशांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. 25 मेपासून एक तृतीयांश क्षमतेसह देशांतर्गत विमान उड्डाणे चालू आहेत. सर्वप्रथम नागरी उड्डयन विभाग, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि विविध एअर लाईन्स कंपन्यांनी दावा केला होता, की प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची चोख सुरक्षाव्यवस्था केली आहे. पण पहिल्या दिवसापासून फ्लाईट्समध्ये कोरोनाग्रस्त प्रवाशांच्या केसेस समोर येऊ लागल्या.
या प्रकारामुळे प्रशासनही चिंतेत आहे, तसेच एअरलाईन कंपन्यासुद्धा लॉकडाऊनमुळे ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीशी झगडत आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे मिळून आतापर्यंत 7 फ्लाईट्समध्ये 17 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अशा परिस्थितीत सरकार आणि एअरलाईन कंपन्यांचे सुरक्षा आणि कोरोनाविषयीचे दावे फोल ठरले आहेत.
दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. गुरुवारी राज्यात २, ५९८ नवीन कोरोना रुग्ण वाढले आहेत.