ETV Bharat / city

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट..! ७ आमदारांसह ६१ जण कोविड पॉझिटिव्ह

अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री ते सुरक्षेवरचा पोलीस अशा प्रत्येकास कोरोना चाचणी बंधनकारक होती. मंत्री, अधिकारी, कर्मचारी, पोलीस आणि पत्रकार यांच्या एकूण २२०० आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत.

विधान भवन
विधान भवन
author img

By

Published : Sep 7, 2020, 7:39 PM IST

मुंबई - विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट पसरले आहे. विधिमंडळात सहभागी झालेल्या पत्रकार, कर्मचारी व आमदार यांच्या एकूण २२०० चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६ आमदारांसह ६१ कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कामकाजात सहभाग घेणारे आमदार, मंत्री यांच्याबरोबरच प्रशासनातील अधिकारी यांची ५ आणि ६ सप्टेंबरला कोरोना चाचणी (आरटी-पीसीआर) घेतली. एकूण घेतलेल्या २२०० जणांच्या कोरोना चाचणीत ६१ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामधील ६ ते ७ आमदार असल्याची माहिती विधान भवनातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री ते सुरक्षेवरचा पोलीस अशा प्रत्येकास कोरोना चाचणी बंधनकारक होती. अधिवेशनाला हजेरी लावणे गरजेचे असल्याने अनेक आमदारांनी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर व्यवस्था करण्यात आलेल्या केंद्रावर चाचणी करणे पसंत केले. यात भाजपाचे दोन आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक महिला आमदार, शिवसेनेनेला पाठिंबा देणारा एक आमदार असे मिळून ७ आमदार कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. ज्या आमदारांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे त्यांनी पुढील उपचाराच्यादृष्टीने रूग्णालयात दाखल होत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.