ETV Bharat / city

मुंबै बँक कथित घोटाळा प्रकरणी सत्र न्यायालयाचा 5 ऑक्टोबरला निकाल - मुंबै बँक कथित घोटाळा प्रकरणी सत्र न्यायालयाचा निकाल

मुंबै बँकेत 123 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जोगळेकर यांनी निकाल 5 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला आहे. राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेच्या चौकशीचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.

Bjp leader pravin darekar
Bjp leader pravin darekar
author img

By

Published : Sep 29, 2021, 7:03 PM IST

Updated : Sep 29, 2021, 7:15 PM IST

मुंबई - मुंबै बँकेत 123 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जोगळेकर यांनी निकाल 5 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे मुंबै बँकेत असलेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना दिलासा मिळणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई बँकेत 123 कोटी रुपयांचा कथित घोटाळा झाला असल्याचा आरोप तक्रारदार विवेकानंद गुप्ता यांनी गुन्हे शाखेकडे केला होता. सत्र न्यायालयात या सर्व प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून आज न्यायाधीश जोगळेकर याबाबत निकाल देण्याची शक्यता होती. मात्र न्यायाधीशांनी या प्रकरणाचा निकाल 5 ऑक्टोबरला देणार असल्याचे आज जाहीर केले आहे.

मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर
बँकेची नाहक बदनामी करणाऱ्यांवर हजार कोटींचा दावा -
राजकीय सुडापोटी केवळ मुंबै बँकेवर आरोप केले जात आहेत. त्यामुळे केवळ राजकीय आकसापोटी मुंबै बँकेवर आरोप करणाऱ्यांवर हजार कोटींचा दावा मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्याकडून करण्यात आला आहे. मात्र या घोटाळा प्रकरणात न्यायमूर्ती 5 ऑक्टोबरला काय निकाल देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

हे ही वाचा - राजकीय कलगीतुरा.. महाआघाडीच्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणा, तर भाजपा नेत्यांच्या मागे राज्य तपास यंत्रणांचा ससेमिरा

सहकार विभागाकडून मुंबै बँकेच्या चौकशीचे आदेश -

राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेच्या चौकशीचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. बँकेच्या कामकाजात असलेल्या अनियमिततेमुळे बँकेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबतचा अहवाल तीन महिन्यात सादर करण्यास सहकार विभागाने सांगितले आहे. मात्र केवळ राजकीय सूडापोटी सहकार विभागाकडून अशा प्रकारची कारवाई केली जात असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच आपल्यावर असलेल्या राजकीय सूडापोटी बँकेला धारेवर धरले जात असून काही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून बँकेची बदनामी केली जात असल्याचा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला आहे. त्यामुळे जाणून-बुजून बँकेची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात एक हजार कोटींचा दावा बँकेकडून करण्यात आला आहे.

Last Updated : Sep 29, 2021, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.