ETV Bharat / city

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणीचा आवाज पडताळणीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

इंद्राणी मुखर्जीचा आवाज रेकॉर्डिंगचा अहवाल दाखल केला होता. मात्र याबाबतचा अहवाल मान्य करण्यात येऊ नये याकरिता इंद्राणीने अर्ज दाखल केला होता. हा अर्ज आज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे इंद्रायणी मुखर्जीच्या आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

इंद्राणी मुखर्जीचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

author img

By

Published : Sep 14, 2022, 8:16 PM IST

मुंबई - विशेष सीबीआय कोर्टामध्ये सीबीआयच्यावतीने इंद्राणी मुखर्जीचा आवाज रेकॉर्डिंगचा अहवाल दाखल केला होता. मात्र याबाबतचा अहवाल मान्य करण्यात येऊ नये याकरिता इंद्राणीने अर्ज दाखल केला होता. हा अर्ज आज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे इंद्रायणी मुखर्जीच्या आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

इंद्राणी मुखर्जीची आणि राहुल मुखर्जीचा रेकॉर्डिंग मधील आवाज तपासण्याकरिता सीबीआयने परवानगी घेतली होती. मात्र इंद्राणी मुखर्जीचा आवाज खरा आहे की नाही हे चेक करण्याकरिता इंद्राणीच्या मोबाईलमधील आवाजाची तपासणी करणे गरजेचे असताना सीबीआयने खार पोलीस स्टेशनमध्ये जप्त असलेल्या सीडी मधील रेकॉर्डिंगमधील आवाज तपासला होता. तो अहवाल फेटाळण्यात यावा अशी मागणी इंद्राणी मुखर्जीच्या वतीने करण्यात आली होती. ही मागणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने फेटाळून लावली आहे.

इंद्राणी मुखर्जी प्रकरणात सीबीआयची मोठी चूक - मोबाईल रेकॉर्डिंग ऐवजी सीडीमधील आवाजाची तपासणी केली होती. त्यामुळे इंद्राणी मुखर्जी प्रकरणात CBI तपासावर प्रश्नचिन्ह लागले आहे. ऑडिओ व्हॉईस सॅम्पल तपास प्रक्रियेत मोठी तांत्रिक चूक असल्याचे देखील इंद्राणीच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले आहे. खार पोलिसांच्या ताब्यातील CD तील ऑडिओ CBI ने मॅचिंग करता वापरला आहे. मोबाईल वरील ऑडिओ मॅच करण्यासाठी घेतलं होतं. इंद्राणीच्या आवाजाचं सॅम्पल घेतले होते. याच चुकीवर इंद्राणीच्या वकिलांनी आज सुनावणी दरम्यान आक्षेप घेतला होता.

काय आहे प्रकरण - इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. ज्यात प्रथम पतीपासून मुलगी झाली. तिचं नाव शीना बोरा होतं. इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी हा इंद्राणी मुखर्जीचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितलं जातं. इंद्राणी आणि पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती. शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणीशिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार शीनाच्या राहुलसोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिक वाद हा हत्येमागील संभाव्य कारण होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.