मुंबई : जगातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी ( Famous Industrialist Mukesh Ambani Threatened Case ) देण्यात आली होती. रिलायन्सच्या लँडलाईन फोनवर धमकी दिल्या प्रकरणात 15 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आलेल्या आरोपीला मुंबई सत्र न्यायालयाने वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. भविष्यात ( Bombay Sessions Court Granted Bail to Accused ) अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही, असे हमीपत्र देण्यासही न्यायालयाने आरोपी बिष्णू भौमिकच्या कुटुंबीयांना सांगितले आहे.
रिलायन्स हॉस्पिटलच्या लँडलाईन नंबरवर आठ वेळा कॉल : रिलायन्स हॉस्पिटलच्या लँडलाईन नंबरवर आठ वेळा कॉल करून फोनवर धमकी देण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांकडून आरोपीला अटक केली होती. उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 56 वर्षीय बिष्णू भौमिकला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. ए. कुलकर्णी यांनी 15 सप्टेंबर रोजी भौमिकला 15,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
आरोपी बिष्णू भौमिक बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त : आरोपी बिष्णू भौमिकचे वकील शंभू झा यांनी असा युक्तिवाद केला की, 56 वर्षीय व्यक्ती बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त आहे. एक मानसिक आरोग्य स्थिती ज्यामुळे भावनिक उच्च आणि न्यून यांचा समावेश होतो. बायपोलर डिसऑर्डरग्रस्त असल्याचे दाखविणारे डॉक्टरांचे अहवालही न्यायालयासमोर सादर केले होता. याशिवाय दोषी आढळल्यास कायद्यानुसार कमाल शिक्षा दोन वर्षांची आहे. भौमिक गेल्या दीड महिन्यांपासून कोठडीत आहेत, असे झा म्हणाले.
भौमिकच्या जामीन अर्जाला विरोध : अतिरिक्त सरकारी वकील मीरा चौधरी यांनी भौमिकच्या जामीन अर्जाला विरोध केला की त्याने असा फोन करण्याची ही पहिलीच घटना नाही. मात्र भौमिकची प्रकृती तपासल्यानंतर न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला. तथापि न्यायालयाने त्याच्या कुटुंबातील सदस्यांपैकी एकाला न्यायालयाला हमी देण्यास सांगितले आहे की तो भौमिकची काळजी घेईल की भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही.
पोलिसांकडून अंबानी कुटुंबाचे निवासस्थानी सुरक्षेत वाढ : मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलच्या लँडलाइन नंबरवर कॉल करून उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी ऑगस्टमध्ये दहिसरच्या ज्वेलर्सला अटक केली होती. आरोपीने रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात वारंवार कॉल करून मारण्याची धमकी दिली तसेच गंभीर परिणामांचा इशारा दिला. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलने एकूण तीन धमकीचे कॉल रेकॉर्ड केले आहेत. यानंतर पोलिसांनी रुग्णालय आणि अंबानी कुटुंबाचे निवासस्थान अँटिलिया येथे सुरक्षा वाढवली आहे.