ETV Bharat / city

कंगना रणौतच्या हस्तांतरण याचिकेवर 4 फेब्रुवारीला मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी

ज्येष्ठ पटकथा लेखक, कवी जावेद अख्तर जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या फौजदारी कारवाईच्या हस्तांतरणाची मागणी करणारी याचिका अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने कोर्टाने फेटाळली.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jan 27, 2022, 9:13 PM IST

मुंबई - ज्येष्ठ पटकथा लेखक, कवी जावेद अख्तर जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या फौजदारी कारवाईच्या हस्तांतरणाची मागणी करणारी याचिका अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने कोर्टाने फेटाळली. त्यानंतर त्या निर्णयाविरोधात अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई सत्र न्यायालयात सोमवारी धाव घेतली होती. या याचिकेवर आज (दि. २७ जानेवारी) रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीधर भोसले यांच्यासमोर सुनावणी झाली आहे. यावेळी न्यायाधीश भोसले यांनी दोन्ही पक्षांच्या वकिलांना विचारले की खटल्याच्या गुणवत्तेत न जाता या मुद्द्यावर सुनावणी करता येईल का ?, रनौतची बाजू मांडणारे अॅड. रिजवान सिद्दीकी यांनी आक्षेप घेतला नाही तर जावेद अख्तर यांचे वकिल अ‌ॅड. भारद्वाज यांनी सध्याच्या अर्जावर गंभीर आक्षेप असल्याचे सांगत तीव्र विरोध केला. हा विरोध नोंदवून न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.

कंगना रणौतच्या वकिलांकडून आज मुंबईत सत्र न्यायालयामध्ये युक्तिवाद करण्यात आला त्यावेळी न्यायमूर्ती खान यांच्यासमोर सुरू असलेल्या कार्यवाहीच्या हस्तांतरणाची मागणी करणार्‍या सत्र न्यायालयाच्या विशेष अधिकार क्षेत्राचा वापर करून फौजदारी प्रक्रिया संहिता सीआरपीसीचे कलम 408 अंतर्गत करण्यात आले असल्याचे कंगना रणौतच्या वकिलाकडून आज याचिकेवर उत्तर देण्यात सांगण्यात आले आहे. रणौतने तिच्या बदलीच्या याचिकेत दावा केला होता की अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी जाणूनबुजून तिला दुखापत करण्यासाठी आपल्या अधिकाराचा प्रचंड गैरवापर केला, असेही याचिकेत दावा करण्यात आला आहे.

जावेद अख्तर यांच्या वकिलांकडून याचिकेवर उत्तर देताना सांगण्यात आले की, आजपर्यंत कंगना रणौत यांनी पाच वेळा अंधेरी न्यायालयाच्या निर्णया विरोधात याचिका केली आहे. ही सहावी वेळ आहे मुंबई सत्र न्यायालयात याचिका करण्याचे कंगना रणौत कार्यवाहीला विलंब आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच आतापर्यंत जाणीवपूर्वक अनुपस्थितीमुळे रेकॉर्ड केली जाऊ शकली नाही, असा आरोपही यावेळी जावेद अख्तर यांच्या वकिलाकडून मुंबई सत्र न्यायालयात आज करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ..? - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अर्णव गोस्वामी यांनी घेतलेल्या मुलाखतीत कंगनाने आपल्याविरोधात बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी केली', अशी तक्रार गीतकार जावेद अख्तर यांनी वकिल अ‌ॅड. जय भारद्वाज यांच्यामार्फत केली. याविषयी पोलिसांच्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, वारंवार नोटीस देऊनही कंगना रणौत न्यायालयात हजर राहिली नाही. त्यामुळे महानगर न्यायदंडाधिकारी आर.आर. खान यांनी कंगनाला अखेरची संधी देत पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश मागील सुनावणीत दिले होते. शिवाय कंगना पुन्हा गैरहजर राहिल्यास तिच्याविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा अख्तर यांना दिली होती.

काय म्हटले होते कंगनाने? - कंगनाने तिच्या आरोपात म्हटले होते, की जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले होते. या भेटीत त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला, की ऋतिक रोशन व त्याचे वडील ही मोठी माणसे असून जर तू त्यांची माफी मागितली नाही तर ती माणसे तुला सोडणार नाहीत. तुला तुरुंगात पाठवतील व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना तुझ्याशिवाय आणखी कोणी जबाबदार नसेल. त्यानंतर कदाचित तुझ्याकडे कुठला पर्यायसुद्धा उरणार नाही व तुला आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दात जावेद अख्तर यांनी मला धमकविण्याचा प्रयत्न केला होता. कंगनाची बहीण रंगोली चंदेलनेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर जावेद अख्तर यांच्या विरोधात अशाच प्रकारचे आरोप केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.