ETV Bharat / city

Fire Incident Mumbai : कमला इमारतीच्या आगीतील गंभीर रुग्णांची संख्या ९ वर - BMC

नाना चौक येथील कमला या इमारतीला २२ जानेवारीला आग लागली होती. या आगीत ( Fire Incident Mumbai ) २९ जण जखमी झाले असून नऊ जणांची परिस्थिती गंभीर आहे. या जखमींपैकी आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Jan 25, 2022, 3:45 PM IST

मुंबई - नाना चौक येथील कमला या इमारतीला २२ जानेवारीला आग लागली ( Fire Incident Mumbai ) होती. या आगीत २९ जण जखमी झाले. या जखमींपैकी आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील ८ जणांची प्रकृती गंभीर होती. त्यात आता आणखी एकाची भर पडली असल्याने गंभीर रुग्णांची संख्या ९ वर गेली आहे. जखमींपैकी एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

विविध रुग्णालयात दाखल - ताडदेव परिसरातील भाटिया रुग्णालय जवळ कमला इमारत आहे. २० मजली असलेल्या या इमारतीत १९ व्या मजल्यावर २२ जानेवारीला सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास आग ( Mumbai Fire Incident ) लागली. या आगीवर १३ फायर इंजिन, ८ जम्बो टॅंकरद्वारे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नियंत्रण मिळवले होते. आग आणि धूर यामुळे इमारतीतील रहिवाशांना घरातून व व्हरांड्यातून बाहेर पडणे कठीण जात असल्याने अग्निशमन दलाने त्यांची सुटका करून रुग्णालयात दाखल केले. या घटनेत २९ जणांना भाटिया, कस्तुरबा, नायर, मसीना आदी रुग्णालयात दाखल केले असता त्यामधील ७ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

९ जण आजही गंभीर - मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कस्तुरबा रुग्णालयात १, मासिना रुग्णालयात १ तर भाटिया रुग्णालयात दाखल असलेल्या १२ पैकी ७ जण अशा एकूण ९ जणांची प्रकृती गंभीर आहे. नायर रुग्णालयात २ जण दाखल असून त्यापैकी मंजू खन्ना यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एका रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने कळविले आहे.

चौकशी समिती नियुक्त - आगीच्या या घटनेची चौकशी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी समिती नेमण्याचे आणि पंधरा दिवसांच्या आत दुर्घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महानगरपालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ २) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये डी विभागाचे सहायक आयुक्त, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत), उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव) (शहर), उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांचा देखील समावेश आहे. आग लागल्याचे नेमके कारण, आग पसरून सहा नागरिकांचा मृत्यू होण्यामागील कारण आणि सदर इमारतीच्या मंजूर आराखड्यामध्ये कोणतेही विनापरवानगी बदल करण्यात आले असल्यास त्याची शहानिशा करणे या अनुषंगाने ही समिती चौकशी करणार आहे.

मृतांची नावे -

मीना मिस्त्री
मौसमी मिस्त्री
हितेश मिस्त्री
मंजूबेन कथारिया
पुरुषोत्तम चोपडेकर
अनोळखी मृतदेह
मनीष सिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.