मुंबई - आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर मार्केटमध्ये मोठ्या अंकानी कोसळला ( Sensex Crashes ) आहे. सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये 2 टक्क्यांहून जास्त घसरण झाली आहे. सेन्सेक्स 1500 ( Sensex crashes 1500 points ) आणि निफ्टी 400 अंकांकी कोसळला आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. रशिया व युक्रेनमधील तणाव आणि एजीबी शिपयार्डने केलेल्या हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यामुळे शेअर मार्केटमध्ये निराशेचे वातावरण आहे.
युक्रेन आणि रशिया तणावाचा परिणाम -
भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सोमवारी 2 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. कारण युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणावाच्या वातावरणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सात वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या.
2 टक्कांची घसरण -
बेंचमार्क सेन्सेक्सने सोमवारच्या व्यवहाराची सुरुवात लाल रंगात 56,720.32 अंकांवर केली आणि सकाळच्या व्यापारात 56,612.07 अंकांच्या नीचांकी पातळीवर घसरला, मागील सत्राच्या बंद 58,152.92 अंकांच्या तुलनेत 1540.85 अंकांनी खाली आला आहे. दुपारी 12.08 वाजता, 30 स्टॉकचा S&P BSE सेन्सेक्स 56,992.35 अंकांवर व्यापार करत होता, जो त्याच्या मागील सत्राच्या बंदच्या तुलनेत 1160.57 अंक किंवा 2.00 टक्क्यांनी कमी आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 50 हा मागील सत्राच्या 17,374.75 अंकांच्या बंदच्या तुलनेत 364.80 अंकांनी किंवा 2.1 टक्क्यांनी घसरून 17,009.95 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टीने 17,076.15 अंकांवर लाल रंगात आठवड्याच्या व्यवहाराची सुरुवात केली आणि 16,916.55 अंकांच्या नीचांकी पातळीवर घसरला.
हेही वाचा - Sanjay Raut : जो उखाड़ना है, उखाड़ लो, हम डरेंगे नहीं! संजय राऊत आक्रमक, उद्या घेणार पत्रकार परिषद