ETV Bharat / city

पर्यायी घरासाठी वृद्धाचे पालिका कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने तानसा पाईपलाईनवरील घरे पालिकेने पाडली. या प्रकल्पग्रस्तांचे चेंबूरला माहुल येथे पूनर्वसन करण्यात आले.  मात्र, किसान गोपाळे या वयोवृद्ध प्रकल्पग्रस्ताला घर न दिल्याने त्यांनी आंदोलन सुरू आहे.

घाटकोपर येथील 'एन' वॉर्ड कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करताना किसान गोपाळे
author img

By

Published : Aug 20, 2019, 8:03 AM IST

Updated : Aug 20, 2019, 8:15 AM IST

मुंबई - महानगर पालिकेने तानसा पाईपलाईनमध्ये बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन माहुल येथे केले. मात्र, घाटकोपर भटवाडी येथील तानसा पाईपलाईनमधील बाधित असलेल्या किसान गोपाळे या वृद्ध व्यक्तीला घर दिलेले नाही. यामुळे किसन गोपाळे यांनी पालिकेच्या घाटकोपर येथील 'एन' वॉर्ड कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले.

घाटकोपर येथील 'एन' वॉर्ड कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करताना किसान गोपाळे

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने तानसा पाईपलाईनवरील घरे पालिकेने तोडली. या प्रकल्पग्रस्तांचे चेंबूरला माहुल येथे पूनर्वसन करण्यात आले. किसान गोपाळे यांचे असे म्हणणे आहे की, 'घाटकोपर भटवाडी येथील तानसा पाईपलाईन येथे त्यांची दोन घरे होती. एक गोपाळे यांच्या नावाने तर एक घर भीमाशंकर परिसर विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या नावे होते. तसेच राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार या दोन्ही घरांची कागदपत्रे पालिकेच्या घाटकोपर येथील 'एन' वॉर्ड कार्यालयात जमा केली असल्याचेही गोपाळे यांनी सांगितले.

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी छाननी करताना माझे एकच घर पात्र ठरवले. राज्य सरकारच्या शासन निर्णया प्रमाणे पुरावे देऊनही डी-९२ क्रमांकाचे माझ्या संस्थेच्या नावे असलेले घर अपात्र ठरविण्यात आले. पावसाळ्यात घरे तोडू नयेत असे आदेश असाताना हे घर २०१६ मध्ये तोडण्यात आले. गेले तीन वर्षे मी घरासाठी पाठपुरावा करत आहे. मात्र, आकसापोटी माझ्या संस्थेच्या नावाने असलेले घर देण्यात आलेले नाही, असा आरोप गोपाळे यांनी केला.

घर दिले जात नसल्याची तक्रार गोपाळे यांनी वेळोवेळी पालिका आयुक्त, उपायुक्त, एन विभाग कार्यालय यांना अर्ज देवून केली आहे. त्यानंतरही गोपाळे यांना गेल्या तीन वर्षांत घर दिले नसल्याने या प्रकरणाची व दिलेल्या कागदपत्रांची पुन्हा छाननी करून घर द्यावे, या मागणीसाठी गोपाळे यांनी सोमवारी पालिकेच्या घाटकोपर येथील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले.

Intro:मुंबई - मुंबई महानगर पालिकेने तानसा पाईपलाईनमध्ये बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन माहुल येथे केले. मात्र घाटकोपर भटवाडी येथील तानसा पाईपलाईनमधील बाधीत असलेल्या किसान गोपाळे या वयोवृद्ध व्यक्तीला घर दिलेले नाही. यामुळे किसन गोपाळे यांनी पालिकेच्या घाटकोपर येथील 'एन' वॉर्ड कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. Body:मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने तानसा पाईपलाईनवरील घरे पालिकेने तोडली. या प्रकल्पग्रस्तांचे चेंबूरला माहुल येथे पूनर्वसन करण्यात आले. घाटकोपर भटवाडी येथील तानसा पाईपलाईन येथे माझी दोन घरे होती. एक माझ्या नावाने तर एक घर भीमाशंकर परिसर विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या नावे होते. राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार या दोन्ही घरांची कागदपत्रे मी पालिकेच्या घाटकोपर येथील "एन" वॉर्ड कार्यालयात जमा केली होती.

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी छाननी करताना माझे एकच घर पात्र ठरवले. राज्य सरकारच्या शासन निर्णया प्रमाणे पुरावे देऊनही डी - ९२ क्रमांकाचे माझ्या संस्थेच्या नावे असलेले घर अपात्र ठरविण्यात आले. पावसाळ्यात घरे तोडू नयेत असे आदेश हे घर २०१६ मध्ये तोडण्यात आले. गेले तीन वर्षे मी घरासाठी पाठपुरावा करत आहे. मात्र, आकसापोटी माझ्या संस्थेच्या नावाने असलेले घर देण्यात आलेले नाही.

मला घर दिले जात नसल्याची तक्रार मी वेळोवेळी पालिका आयुक्त, उपायुक्त, एन विभाग कार्यालय यांना अर्ज देवून केली आहे. त्यानंतरही मला गेल्या तीन वर्षांत घर दिले नसल्याने या प्रकरणाची व मी दिलेल्या कागदपत्रांची पुन्हा छाननी करून मला घर द्यावे. या मागणीसाठी मी आज पालिकेच्या घाटकोपर येथील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केल्याचे गोपाळे यांनी सांगितले.

बातमीसाठी आंदोलनाचे vis आणि बाईट Conclusion:
Last Updated : Aug 20, 2019, 8:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.