ETV Bharat / city

Omicron In Mumbai : मुंबईत 11 आणि 12 डिसेंबरला जमावबंदीचे आदेश, राज्यात 7 नवे ओमायक्रॉनचे रुग्ण

कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron in Mumbai ) व्हेरिएंटने खळबळ उडवली आहे. सध्या भारतात ओमायक्रॉनचे रुग्ण (Omicron in India) आढळून येत आहेत. मुंबईत ओमायक्रॉन रुग्ण आढळल्यानंतर राज्य सरकारने तातडीने पावले उचलत मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.

Omicron in Mumbai
मुंबईत ओमायक्रॉन
author img

By

Published : Dec 11, 2021, 8:50 AM IST

Updated : Dec 11, 2021, 3:25 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूची लाट ओसरल्यानंतर परिस्थिती हळुहळु पूर्वपदावर येत होती. मात्र, कोरोनाच्या ओमायक्रॉन ( Omicron in Mumbai ) व्हेरिएंटने खळबळ उडवली आहे. सध्या भारतात ओमायक्रॉनचे रुग्ण (Omicron in India) आढळून येत आहेत. मुंबईत ओमायक्रॉन रुग्ण आढळल्यानंतर राज्य सरकारने तातडीने पावले उचलत मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.

Omicron In Mumbai
जमावबंदीचा आदेश

राज्यात सात नवे रुग्ण -

देशात कोरोना विषाणूच्या नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron in India) खळबळ उडवली आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे (Omicron in Maharashtra) पुन्हा 7 नवे रुग्ण आढळले आहेत. यात गंभीर बाब म्हणजे या नव्या 7 रुग्णांमध्ये एक जण अवघ्या साडेतीन वर्षांचा ( 3-yr Old From Maharashtra Tests Positive) आहे. तर एकूण महाराष्ट्रात ओमायक्रॉनची बाधा झालेले 17 रुग्ण आहेत.

एक रुग्ण आहे साडे तीन वर्षाचे बालक -

सात रुग्णांपैकी चार रुग्णांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. एका रुग्णाने कोविड लसीची एक मात्रा घेतलेली आहे, तर एका रुग्णाने एकही मात्रा घेतलेली नाही. अन्य एक रुग्ण हे साडे तीन वर्षाचं बालक असल्याने, त्यालाही कोविड लसीची मात्रा देण्यात आलेली नाही. या तीन रुग्णांमध्ये आजाराची सौम्य लक्षणं दिसत असून, इतर चौघांमध्ये मात्र काहीही लक्षणं दिसत नसल्याचं, आरोग्य विभागाकडून सांगण्यात आला आहे.

144 कलम लागू -

राज्य सरकारने 11 आणि 12 डिसेंबर रोजी मुंबईत कलम 144 CrPC (144 CrPC imposed in Mumbai ) लागू केले आहे. रॅली/मोर्चे/मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्यात वाढत्या ओमयाक्रॉनच्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत देशाच्या कोरोना कृतिदलाचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १७ ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निर्बंध लावण्यात आले आहेत.

आरोग्य विभागाचे आवाहन -

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

हेही वाचा - ETV BHARAT SPECIAL - पाहा.. राज्यातील ओमायक्रॉन स्थितीचा आढावा घेणारा 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट

Last Updated : Dec 11, 2021, 3:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.