ETV Bharat / city

तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर अन्न पुरवठा यंत्रणा सज्ज - आदिवासी विकास महामंडळ

ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता असली तरी त्यासाठी राज्याचा अन्न आणि नागरी पुरवठा विभाग सज्ज असल्याचा दावा विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी केला आहे. तर राज्यात धान खरेदी जोरदार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Dec 8, 2021, 3:50 AM IST

मुंबई - ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता असली तरी त्यासाठी राज्याचा अन्न आणि नागरी पुरवठा विभाग सज्ज असल्याचा दावा विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी केला आहे. तर राज्यात धान खरेदी जोरदार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्याचा अन्न आणि पुरवठा विभागाची यंत्रणा सज्ज आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून गरिबांना दोन किलो तांदूळ आणि तीन किलो गहू देण्यात येतो ही योजना मार्च अखेरीपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, गरज पडल्यास राज्यातील नागरिकांपर्यंत धान्य पोहोचवण्यासाठी यंत्रणा पुरेशी सक्षम असल्याचा दावा विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी केला आहे. ओमायक्रॉन या नव्या व्हेरीएंटमुळे तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असला तरीही नागरिकांपर्यंत पुरेसे अन्नधान्य पोहोचवण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. तसेच पुरेसा धान्यसाठा असल्याचेही विजय वाघमारे यांनी स्पष्ट केले.

धान खरेदी जोरदार सुरू

खरीप हंगामातील धान खरेदी विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार सुरू असून आतापर्यंत १७५ कोटी रुपयांची धान खरेदी झाली असल्याची माहिती वाघमारे यांनी दिली. यावर्षी धान खरेदी करणाऱ्या आधीच्याच यंत्रणा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. तर राईस मिलर कंपन्यांनाही परवानगी पुढे चालू ठेवण्यात आल्याने फारसा गोंधळ झाला नाही आणि वेळही वाचला आहे. शेतकऱ्यांना धानापोटी प्रति क्विंटल १ हजार ९४० आणि १ हजार ९६० रुपये हमीभाव देण्यात आला आहे. आतापर्यंत १७५ कोटी रुपयांची धान खरेदी झाली आहे. तर जानेवारीपर्यंत सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची धान्य खरेदी होईल, असा विश्वास वाघमारे यांनी व्यक्त केला आहे. धान खरेदी केलेल्या रकमेची शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होते. धान खरेदीनंतर पंधरा दिवसात शेतकऱ्यांना ही रक्कम देण्यात येते.

बारदाना निविदा वेळेत

दरवर्षी धान खरेदीसाठी बारदाना अपुरा पडत असल्याची चर्चा होते. बारदाना अभावी धान खरेदीमध्ये अडथळा येत असतो. मात्र, यंदा वेळेआधीच बारदाना खरेदी करण्यात आली. तसेच पुढील धान खरेदीसाठी बारदाना खरेदीचे टेंडर काढण्यात आले असून तीस ते पस्तीस लाख बारदाना लवकरच खरेदी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

धान खरेदीमुळे अन्नधान्य साठ्यात वाढ

खरीप हंगामात आतापर्यंत एक कोटी २३ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. तर रब्बी हंगामात सुमारे ५३ लाख क्विंटल धान्य खरेदी केले जाते. महाराष्ट्र फेडरेशनच्या वतीने आणि आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने ही धान खरेदी केली जाते. राज्यात दरमहा दोन लाख १५ हजार मेट्रिक टन गहू आणि एक लाख ६८ हजार मेट्रिक टन तांदूळ वितरित केला जातो.

हे ही वाचा - अनिल देशमुखांच्या खासगी सचिवांचा जामीन अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.