ETV Bharat / city

Maghi Ganesh Jayanti 2022 : माघी गणेश जयंतीसाठी गणेश मूर्तिकारांची लगबग; शाडूच्या मूर्तींना मोठी मागणी

author img

By

Published : Jan 30, 2022, 4:06 PM IST

Updated : Jan 30, 2022, 5:12 PM IST

माघी गणेश जयंतीसाठी मूर्तिकार सज्ज ( Mumbai Based Sculptor Ready ) झालेले आहेत. मागील दोन वर्ष कोरोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर यंदा माघी गणेशोत्सवासाठी मूर्तीकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एकंदरीतच काय तर विविध रूपांमध्ये गणेश मूर्ती मुंबईतील गणेश कारखान्यांमध्ये ( Ganesh Factory in Mumbai ) गणेश भक्तांसाठी सज्ज झालेल्या आहेत.

मूर्तीला आकार देतांना मूर्तीकार
मूर्तीला आकार देतांना मूर्तीकार

मुंबई - येत्या ४ फेब्रुवारीला देशभरात माघी गणेश जयंती ( Maghi Ganesh Jayanti ) साजरी केली जाणार आहे. यासाठी मुंबईतील मूर्तिकार सज्ज ( Mumbai Based Sculptor Ready ) झालेले आहेत. मागील दोन वर्ष कोरोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर यंदा माघी गणेशोत्सवासाठी मूर्तीकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एकंदरीतच काय तर विविध रूपांमध्ये गणेश मूर्ती मुंबईतील गणेश कारखान्यांमध्ये ( Ganesh Factory in Mumbai ) गणेश भक्तांसाठी सज्ज झालेल्या आहेत. या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईकर आतुरतेने वाट बघत आहेत.

मुंबईतील मूर्तीकारांची माघी गणेश जयंती निमित्ताने सुरु असलेली तयारी
  • बाप्पाच्या मूर्तींना दिला जातोय अंतिम आकार

येत्या ४ फेब्रुवारीला माघी गणेश जयंती आहे व त्या निमित्ताने मुंबईतील गणेश कारखान्यांमध्ये मूर्तिकारांची लगबग बघायला भेटते. मूर्तीवर शेवटचा हात फिरवला जात आहे. यंदा गणेश मूर्तींना मागणीसुद्धा वाढलेली आहे. विशेष करून विघ्नहर्त्याच्या आगमनासाठी मुंबईकर उत्साहित झाले आहेत. दुसरीकडे गणेश मूर्तीकारही बाप्पांच्या मूर्तींना अंतिम रूप देत आहेत.

  • शाडूच्या मूर्तींना मोठी मागणी

मुंबईतील सेंच्युरी बाजार, प्रभादेवी येथील श्री मोरया आर्ट या गणेश मूर्ती चित्रशाळेत विविध रूपांमध्ये गणेशांच्या मूर्ती येथे बघायला मिळतात. विशेष म्हणजे या सर्व मूर्तीं शाडूच्या मातीच्या आहेत. मागील ५० वर्षांपासून बाळाराम मुरलीधर पाटील हे मूर्तीकार हा व्यवसाय करत आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक पावसाळे बघितले आहेत. परंतु कोरोनाच्या महामारीत त्यांना या व्यवसायात मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. कोरोनाच्या पहिल्याच वर्षी 2020 ला जो आर्थिक फटका त्यांना बसला, तो ते कधीच विसरू शकत नाहीत. तेव्हा वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने त्यावर्षी शाडूची माती, इतर साहित्य उपलब्ध झाले नाही. शाडूची माती गुजरात, भावनगर येथील शहापूर येथून येते. परंतु त्या वर्षी मातीच उपलब्ध नसल्याने त्याचा फार मोठा आर्थिक फटाका सर्वच मूर्तिकारांना बसला. परंतु मागच्या वर्षी हे चित्र थोड बदलत असताना यंदा हे चित्र पूर्णपणे बदललेल आहे. यंदा गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. त्याचप्रमाणे गणपती बाप्पाची विविध रूप इथे आपल्याला बघायला मिळतात. बाळाराम पाटील यांना त्यांच्या कामांमध्ये त्यांचा मुलगा मयुरेश पाटील हा सुद्धा मदत करतो. कृष्णा गोपाळ मालवणकर हे बाळाराम पाटील यांचे गुरु. त्यांच्याकडून हा वारसा त्यांना आलेला आहे. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागील ५० वर्षांपासून ते फक्त शाडूच्या मातीच्याच मूर्तीं या कारखान्यात बनवल्या जातात. या शाडूच्या मूर्तीला प्रचंड मागणी आहे, असेही बाळाराम पाटील यांनी सांगितले आहे.

  • किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ

अगोदरच कोरोनाच्या महामारीत हवालदिल झालेले मूर्तिकार वाढत्या महागाईने सुद्धा त्रस्त झाले आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वच वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत. शाडूच्या मातीपासून ते मूर्तीसाठी लागणारे विविध साहित्य असेल या सर्वांची किंमत वाढल्याने बाप्पाच्या मूर्तींच्या किमतीत यंदा १० ते १५ टक्क्यांनी वाढ झालेली आहे, असे पाटील म्हणाले. मूर्तींच्या किंमतीमध्ये वाढ जरी झाली असली तरीसुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्तीसाठी गणेश भक्त आनंदाने पैसे देतात, असेही पाटील म्हणाले.

हेही वाचा - Success Story : युट्यूब बनले सुजतासाठी खासगी शिकवणी वर्ग, NEET परीक्षेत मिळवले घवघवीत यश

Last Updated : Jan 30, 2022, 5:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.