ETV Bharat / city

School Reopening in Maharashtra : राज्यात आजपासून पुन्हा चिमुकल्यांची किलबिल; १ ली ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू - महाराष्ट्र ऑफलाईन शाळा सुरू

ज्या विद्यार्थ्यांचे पालक संमती देतील त्याच विद्यार्थ्यांना शाळेत शिकवले ( guardians consent for offline education ) जाणार आहे. तर इतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे. ईटीव्ही भारतने ठाणे आणि मुंबईसह इतर शहरांतील शाळेतील स्थितीची माहिती घेतली आहे. ठाण्यातील श्री माँ  बालनिकेतन ( Shree Maa Balniketan school offline ) या शाळेत विद्यार्थ्यांचे तापमान तपासणी करत, सॅनिटाईझर, सोशल डिस्टन्स आणि मास्कचा वापर करून शिक्षक शिकवताना दिसून आले.

विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर
विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर
author img

By

Published : Jan 24, 2022, 8:33 PM IST

Updated : Jan 24, 2022, 8:49 PM IST

मुंबई- कोरोनाची तिसरी लाट आली असतानाही शाळांमध्ये आजपासून मुलांची किलबिलाट ( schools reopen in coronas third wave ) सुरू झाली आहे. लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याने राज्यातील शाळा ४ जानेवारी ते १५ फेब्रुबारीपर्यंत बंद राहणार होत्या. मात्र, कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने आजपासून १ ली ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

ज्या विद्यार्थ्यांचे पालक संमती देतील त्याच विद्यार्थ्यांना शाळेत शिकवले ( guardians consent for offline education ) जाणार आहे. तर इतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे. ईटीव्ही भारतने ठाणे आणि मुंबईसह इतर शहरांतील शाळेतील स्थितीची माहिती घेतली आहे.

ऑफलाईन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित

हेही वाचा-Genome Sequencing Analysis : मुंबईतील एकूण चाचण्यांपैकी ८९% ओमायक्रॉनबाधित

ठाण्यातील श्री माँ बालनिकेतन ( Shree Maa Balniketan school offline ) या शाळेत विद्यार्थ्यांचे तापमान तपासणी करत, सॅनिटाईझर, सोशल डिस्टन्स आणि मास्कचा वापर करून शिक्षक शिकवताना दिसून आले. आज ऑफ लाईन पद्धतीने शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. कोविडविषयक सर्व नियमांचे पालन करुन ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका , नगरपरिषद, नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक (नर्सरी ते सिनियर केजी) शाळा 24 जानेवारी 2022 पासून प्रत्यक्ष सुरू ( offline schools reopen in Thane ) झाल्या आहेत.

एका बाकड्यावर एक विद्यार्थी
एका बाकड्यावर एक विद्यार्थी

हेही वाचा-Devendra Fadnavis on Thackeray: बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले, असे तुमचे म्हणणे आहे का ? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

ऑनलाइनपेक्षा ऑफ लाईन शिकण्याला पसंती
ऑनलाइनपेक्षा ऑफलाईन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित होताना दिसत आहे. ऑनलाइनमध्ये तांत्रिक अडचणींचा सामना विद्यार्थी आणि शिक्षकांना करावा लागत होता. त्यामुळे ऑफलाईन शिक्षण हे उत्तम असल्याचे शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा-Truck-Bike Accident Near Jintur : जिंतूरजवळ ट्रक-दुचाकीच्या अपघातात 3 भावंडांचा मृत्यू

राज्यात मार्च २०२० ला कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात आल्याने ४ ऑक्टोबर २०२१ पासून इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले होते. रुग्ण आटोक्यात येत असल्याने त्यानंतर पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपासून सुरु झाल्या. मात्र त्यानंतर ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढल्याने पुन्हा ४ जानेवारी २०२२ पासून शाळा पुन्हा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे जाहीर करण्यात आले होते.

शाळेत स्वच्छतेची काळजी
शाळेत स्वच्छतेची काळजी

अशी आहे शाळेतील व्यवस्था -

  • एका बाकावर एक विद्यार्थी बसू शकणार आहेत.
  • इंग्रजी झीग झ्याग पद्धतीने बसण्याची व्यवस्था असेल.
  • संमती दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण मिळेल.
  • संमती न दिलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळेल.
  • मास्क घालून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घ्यावा लागेल.
  • विद्यार्थी एकत्र येऊन किंवा गर्दी होऊन सोशल डिस्टनसिंगचे पालन होणार नाही असे कार्यक्रम करता येणार नाहीत.
  • शाळा वेळोवेळी सॅनिटायझेशन कराव्या लागणार आहेत.

काय आहेत मार्गदर्शक सूचना -

  • पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतचे वर्ग २४ जानेवारीपासून सुरू करण्यात यावेत.
  • विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांकडून संमती पत्र घ्यावे.
  • ज्या विद्यार्थ्यांचे पालक संमती पत्र देणार नाहीत त्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्यावे.
  • सर्व शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहावे.
  • शाळा सुरू करणे व कोविड नियमाच्या पालनाची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असेल.
  • पालिका शाळांचे सहाय्यक आयुक्तांच्या मदतीने सॅनिटायझेशन करावे.
  • शाळेतील कोव्हिडं सेंटर, विलगिकरण केंद्र, लसीकरण केंद्र इतर ठिकाणी स्थलांतरित करावे.
  • इतर शाळांनी स्वतःचे सॅनिटायझेशन करून घ्यावे.
  • कोव्हिड सेंटर, रेल्वे स्टेशनवर कोव्हिडं लसीकरण प्रमाणपत्र तपासणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा शाळेच्या कामासाठी परत बोलवावे.
  • सर्व शाळा पालिकेच्या किंवा खासगी आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात.
  • मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घ्यावे.

Last Updated : Jan 24, 2022, 8:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.