ETV Bharat / city

Online Education : विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करणार - शालेय शिक्षण मंत्री - ऑनलाइन शिक्षण

मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड व अन्य काही महानगरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने ( Corona In Maharashtra ) शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षणाची ( Online Education ) सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( School Education Minister Varsha Gaikwad ) यांनी दिले आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jan 10, 2022, 8:58 PM IST

मुंबई - मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड व अन्य काही महानगरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने ( Corona In Maharashtra ) शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणे शक्य होणार नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नयेत, यासाठी 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची सुविधा ( Online Education ) उपलब्ध करून देण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( School Education Minister Varsha Gaikwad ) यांनी दिले आहेत.

'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' - शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांनी सांगितले की, राज्यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय टप्याटप्याने सुरू करण्यात आल्या होत्या. पण, कोरोनाचा पुन्हा एकदा वाढता प्रादूर्भाव ( Corona In Maharashtra ) लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करून शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. इयत्ता दहावी, बारावीसह सर्वच शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा साधारणतः मार्च महिन्यात सुरू होतात. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नयेत, यासाठी शाळा बंद असल्या तरीही शिक्षण सुरू राहिले पाहिजे, या धोरणानुसार 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' या अभियाना अंतर्गत ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे मंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले.

शिक्षण आयुक्तांना दिले निर्देश - सद्यस्थिती लक्षात घेऊन ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांनी योग्य ती कार्यवाही करावी व ऑनलाइन शाळांची संख्या, उपस्थित विद्यार्थी, अनुपस्थित विद्यार्थी संख्या याची माहिती दररोज शासनास सादर करावी, असे निर्देश वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण आयुक्तांना ( School Education Commissioner ) दिले आहेत.

हेही वाचा - ETV News Impact : अपघातग्रस्ताला तात्काळ मिळण्याकरिता दीड हजार पोलिसांना मिळणार प्रशिक्षण!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.