ETV Bharat / city

Patra Chawl Scam Case : शिवसेना नेते संजय राऊत यांचे आर्थर रोड जेलमधील 50 दिवस - पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरण

संजय राऊत शिवसेनेचा बुलंद आवाज ( Shiv Sena leader and MP Sanjay Raut ) यांना गोरेगाव येथील पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने अटक केली होती. अटक केल्यानंतर आज पर्यंत संजय राऊत यांना कारागृहामध्ये 50 दिवस पूर्ण झाले आहे.

Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : Sep 22, 2022, 11:27 AM IST

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader and MP Sanjay Raut ) यांना गोरेगाव येथील पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने अटक केली होती. सध्या संजय राऊत 4 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी ईडीने अटक केल्यानंतर आज पर्यंत संजय राऊत यांना कारागृहामध्ये 50 दिवस पूर्ण झाले आहे. या 50 दिवसांमध्ये संजय राऊत यांचा प्रवास कसा होता या संदर्भातील एक धावता आढावा.

संजय राऊत शिवसेनेचा बुलंद आवाज : शिवसेना नेते संजय राऊत हे शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. शिवसेनेवर येणारा प्रत्येक वार सामनाच्या माध्यमातून तसेच आपल्या कौशल्य लेखणीतून सामर्थपणे मांडण्यात संजय राऊत चाणक्य मानले जात असत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पाय उत्तर झाल्यानंतर बंडखोरी करून बाहेर पडलेले आमदारांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. मात्र संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू भक्कमपणे सातत्याने मांडत बंडखोर आमदारांना दुर्लक्ष देखील केले होते.

संजय राऊतांच्या घरासमोर शिवसैनिकांची गर्दी : 30 ऑगस्ट रोजी संजय राऊत यांच्या मुलुंड मैत्री या निवासस्थानी सकाळी पहाटे पहाटे ईडीचे अधिकाऱ्यांची टीम सीआरपीएफ जवानांसह दाखल झाली. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण मुंबई सह महाराष्ट्र मध्ये पसरायला सुरुवात झाली. संजय राऊत यांच्या घराची झडती सुरू असतानाच एक टीम दादर येथील संजय राऊत यांच्या फ्लॅटवर दाखल झाली. त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात झडती सुरू झाली. सकाळपासून सुरू असलेल्या चौकशीनंतर संजय राऊत यांना चौकशी करिता ईडीच्या कार्यालयात घेऊन जाणार असल्याची बातमी कळताच संजय राऊत यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत भाजप विरोधात घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली होती. परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबई पोलीस यांनी राऊत यांच्या घराकडे येणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच राऊत यांच्या घरी देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता.

राऊत यांना अखेर न्हेले ईडी कार्यालयात : संजय राऊत यांची सकाळपासून सुरू झालेल्या चौकशीनंतर तब्बल 13 तासानंतर संजय राऊत घरातून ईडी कार्यालयात चौकशी करिता जाण्याकरिता घराबाहेर पडले. त्यावेळी त्यांच्या गळ्यामध्ये भगव्या कलरचा मफलर आणि त्यावर शिवसेनेचा धनुष्यबाण असलेले मखर त्यांच्या गळ्यात होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केली होती. अनेक शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या गाडीला अडवण्याचा प्रयत्न देखील केला मात्र पोलिसांनी या शिवसैनिकांना बाजूला काढले. ईडीचे अधिकारी राऊत यांना अखेर ईडी कार्यालयात घेऊन आले. त्यावेळी ईडी कार्यालयाच्या परिसरातील शंभर मीटर अंतरावर बॅरिगेटिंग लावत प्रवेश बंदी करण्यात आली होती.

अटकेनंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी.एम एल.ए कोर्टामध्ये हजर: शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक केल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी.एम एल.ए कोर्टामध्ये हजर करण्यात आले. त्यावेळी संजय राऊत यांना 8 दिवसाची ईडी कस्टडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी 4 दिवसाची ईडी कस्टडी दिली होती. पुन्हा 8 ऑगस्ट रोजी राऊत यांची कस्टडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले त्यावेळी त्यांना पुन्हा चार दिवसाची कस्टडी देण्यात आली होती. त्यावेळी ईडीच्या वतीने रिमांड अर्जामध्ये असे सांगण्यात आले होते की, अनेक लोकांना सामान पाठवले असल्याने संजय राऊत आणि या प्रकरणाशी संबंधित काही लोकांसमोर चौकशी करणे आवश्यक असल्याने कस्टडी वाढवण्यात यावे अशी मागणी केली होती. 12 ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर राऊत यांना कस्टडी संपल्यानंतर हजर केले असता त्यांची 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये रवांगी करण्यात आली. विशेष म्हणजे या रिमांडच्या वेळेस ईडीने कुठल्याही प्रकारचे कस्टडीची मागणी केली नव्हती.

74 पानाचे आरोप पत्र : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयामध्ये 7 सप्टेंबर रोजी जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर ईडीला 16 सप्टेंबर पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश सत्र न्यायालयाने दिले होते. आरोप पत्र दाखल करण्यापूर्वीच संजय राऊत यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जामुळे ईडीची चांगलीच धावपळ पहायला मिळाली. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर उत्तर सादर करण्याच्या दिवशीच राऊत यांच्या संबंधित आरोप पत्र मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केले होते. विशेष म्हणजे हे आरोप पत्र 74 पानाचे होते तर या प्रकरणातील इतर सर्व आरोपींचे मिळून एकूण आरोप पत्र हे 4000 पानाचे होते.

शिवसेना नेते संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत : न्यायालयीन कोठडीत असताना संजय राऊत यांनी त्यांना आवडीचे असलेले लिखाण काम आणि वाचन कारागृहामध्ये देखील सुरू आहे. संजय राऊत वर करण्यात आलेली ईडीच्या कारवाईवर कारागृहामध्ये पुस्तक लिहत आहे. या पुस्तकांमध्ये संजय राऊत काय नवीन खुलासे करतात हे महत्त्वाचं असणार आहे संजय राऊत कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या पुस्तकांमध्ये काय आहे याकडे सर्वांचे लक्ष आतापासूनच लागलेले आहे.

अंडर ट्रायल कैदी क्रमांक 8959 : शिवसेना खासदार संजय राऊत सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत. अंडर ट्रायल कैदी क्रमांक 8959 अशी त्यांची ओळख आहे. संजय राऊत यांना स्वातंत्र्य बॅरेक मध्ये ठेवण्यात आले आहे ही बॅरेक माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या बाजूची आहे. संजय राऊत यांना हृदयविकाराचा त्रास असल्यामुळे राऊत यांनी न्यायालयामध्ये घरचे जेवण मिळावे याकरिता अर्ज केला होता त्या अर्जाला न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर रोज सकाळी नाष्टा आणि दुपार आणि रात्रीचे जेवण संजय राऊत यांना घरून देण्यात येते. सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान संजय राऊत यांच्या घरून नाश्त्याचा डबा येतो तर अकरा वाजता च्या जवळपास जेवणाचा डब्बा येतो. सायंकाळचे चार वाजता रात्रीचा जेवणाचा डबा संजय राऊत यांच्याकरिता आर्थर रोड कारागृहामध्ये येत असते.

27 सप्टेंबर रोजी होणार सुनावणी : संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 21 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र संजय राऊत यांच्या वकिलांच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला होता की, प्रवीण राऊत यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर स्वातंत्रपणे संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात यावी त्यामुळे आता संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्याचे न्यायालयाने निश्चित केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.