ETV Bharat / city

Sanjay Raut tweet : जहालत एक किस्म की मौत...ईडी नोटीसनंतर संजय राऊत यांचा बंडखोरांवर पुन्हा निशाणा - ईडी नोटीस संजय राऊत

गेली दोन दिवस संजय राऊत या प्रकारचे विधान करत आहेत. सोमवारी संजय राऊत म्हणाले होते, मी काय बोललो, त्यांचा आत्मा मेलेला आहे. फक्त ते जिवंत आहेत आणि ते खरं आहे. माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला. जिवंत प्रेत हा मराठीतला एक शब्दप्रयोग आहे, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी वादग्रस्त विधानावर ( Sanjay Raut clarification on statement ) स्पष्टीकरण दिले.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Jun 28, 2022, 8:05 AM IST

मुंबई - ईडीने नोटीस पाठविल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. बंडखोर आमदार म्हणजे जिवंत प्रेत असल्याचे सूचक ट्विट संजय राऊत यांनी केले. संजय राऊत यांना ईडीने नोटीस दिली आहे. आज ते ईडीसमोर हजर राहण्याची शक्यता कमी आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे. जहालत एक किस्म की मौत है, और जहिल लोक चलती फिरती लाश है...

संजय राऊत यांनी काय केली होती टीका-गेली दोन दिवस संजय राऊत या प्रकारचे विधान करत आहेत. सोमवारी संजय राऊत म्हणाले होते, मी काय बोललो, त्यांचा आत्मा मेलेला आहे. फक्त ते जिवंत आहेत आणि ते खरं आहे. माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला. जिवंत प्रेत हा मराठीतला एक शब्दप्रयोग आहे, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी वादग्रस्त विधानावर ( Sanjay Raut clarification on statement ) स्पष्टीकरण दिले.

संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी समन्स ( ED summons Sanjay Raut ) बजावले आहे. 28 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स संजय राऊत यांना ईडीकडून पाठवण्यात आले आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीचे हे समन्स ( Sanjay Raut in Land corruption ) आले आहे.

ईडीच्या नोटीसनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया- संजय राऊत म्हणाले होते, की, मला आत्ताच समजले ईडीने मला समन्स पाठवले आहेत. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी... हे कारस्थान सुरु आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या... मला अटक करा! जय महाराष्ट्र! असे ट्विट करत राऊतांनी उत्तर दिले.

प्रकरण नेमक काय?

गोरेगावमधील पत्राचाळ जमीन प्रकरणात १ हजार ३४ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊतांवर ( Sanjay Raut in Goregaon Land corruption ) आहे. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाल्याचा आरोप आहे. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा दावा करण्यात आला होता. या भूखंडांची किंमत साधारण ६० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. तसेच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले होते, असाही आरोप संजय राऊत यांच्यावर करण्यात आला आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्यीय मित्र प्रवीण राऊत यांनाही ईडीने अटक ( Praveen Raut arrested by ED ) करण्यात आली होती.

हेही वाचा-Sudhir Mungantiwar : शिवसेनेकडून प्रस्ताव आला तर त्यावर विचार केला जाईल - सुधीर मुनगंटीवार

हेही वाचा-Maharashtra Politics Crisis : 'ही दोस्ती तुटायची नाय'; मित्रप्रेमासाठी दादा भुसे एकनाथ शिंदे गटात

हेही वाचा-Shambhuraj Desai on CM : अडीच वर्षे केवळ नावालाच राज्यमंत्री; शंभूराज देसाई यांचे गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.