ETV Bharat / city

टायमिंग बघा, सर्व टायमिंगचा खेळ.. भावना गवळींच्या सहकाऱ्याला जामीन मिळाल्यावर राऊतांचा ईडीवर निशाणा - भावना गवळी सहकारी जामीन संजय राऊत प्रतिक्रिया

मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना खासदार भावना गवळी यांचे सहकारी सईद खान ( Sanjay Raut on Bhavana Gawali colleague bail ) यांना जामीन मंजूर केला आहे. यावत शिवसेने नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut targets ED ) यांनी भाष्य केले आहे. 'सर्व टायमिंगचा खेळ आहे' अशी खोचक टीका संजय राऊत ( Sanjay Raut on Saeed Khan bail ) यांनी केली आहे.

Bhavana Gawali colleague gets bail
संजय राऊत
author img

By

Published : Jul 6, 2022, 12:29 PM IST

Updated : Jul 6, 2022, 2:42 PM IST

मुंबई - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गेल्या वर्षी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केलेल्या शिवसेना खासदार भावना गवळी ( Sanjay Raut on Bhavana Gawali colleague bail ) यांचा सहकारी सईद खान याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने सईद खान यांना एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. यावर आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत ( Sanjay Raut targets ED ) यांनी निशाणा साधला असून 'सर्व टायमिंगचा खेळ आहे' अशी खोचक टीका केली आहे. ते आज मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी ( Sanjay Raut on Saeed Khan bail ) बोलत होते.

टायमिंग बघा, सर्व टायमिंगचा खेळ

हेही वाचा - Eknath Shinde Uddhav Thackeray Dispute : एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री पदावरुन उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, शिवसेनेने साधली चुप्पी

टायमिंगमध्ये मजा आहे - राऊत म्हणाले की, जी लोक अमच्यातून फुटून त्यांना जाऊन मिळालेत त्यांच्या ईडी केसेस क्लिअर झाले आहेत. आज कुणालातरी जामीन मिळाला आहे. चुकीच्या आरोपांवर देखील लोकांना पकडले जाते. भावना गवळी यांच्या जवळच्या माणसाला जामीन मिळाला, चांगली गोष्ट आहे. अजूनही काही लोक आहेतस, त्यांना सुद्धा लवकरात लवकर जामीन मिळायला हवा. ती कायदेशीर प्रक्रिया आहे. पण टायमिंगमध्ये मजा आहे, टायमिंग पाहा, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

काय आहे प्रकरण ? - 'महिला उत्कर्ष प्रतिष्ठान' नावाच्या ट्रस्टच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप असलेल्या सईद खानला ईडीने सप्टेंबर 2021 मध्ये अटक केली होती. याबाबत सविस्तर आदेश नंतर देऊ, असे न्यायालयाने सांगितले. महाराष्ट्रातील यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी या देखील या प्रकरणातील आरोपी आहेत आणि त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी तीनदा ईडीसमोर हजर राहण्याचा समन्स बजावला होता. सईद खान आणि भावना गवळी यांनी सुमारे 18 कोटी रुपयांचा निधी वळवण्यासाठी फसवणूक आणि भ्रष्टाचार करून ट्रस्टचे खासगी कंपनीत रुपांतर करण्याचा गुन्हेगारी कट रचला, असा ईडीचा आरोप आहे. दरम्यान, आता या सर्व प्रकरणात संजय राऊतांनी भाष्य केल्याने शिंदे-फडणवीस गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

17 कोटी रुपयांची अनियमितता आढळून आल्याचा आरोप - खासदार भावना गवळीशी (Bhavana Gawali) संबंध असलेल्या एका फर्मच्या चौकशीत सईद खान याला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. गवळी या यवतमाळ वाशीम मतदारसंघाच्या खासदार आहेत. मनी लॉन्ड्रिंग (Money laundry case) प्रकरणात ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. गवळींच्या आई शालिनीताईंसोबत सईद खान महिला उत्कर्ष प्रतिष्ठान (Mahila Utkarsh Pratishthan ) नावाच्या फर्मचे संचालक होते. फर्मची स्थापना 2019 मध्ये करण्यात आली होती, परंतु त्यापूर्वी हा एक ट्रस्ट होता ज्यामध्ये गवळी आणि त्यांची आई सदस्य होते. ट्रस्ट कंपनीत बदलण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयात खोटे आरोप करण्यात आले होते की नाही याचा तपास ईडी करत होती. कारण कंपनीचा वापर फसवणूक आणि निधी पळवण्याकरता झाल्याचा संशय होता. ट्रस्टमध्ये सुमारे 17 कोटी रुपयांची अनियमितता आढळून आल्याचा आरोप करण्यात आला होता.

हेही वाचा - वसई-विरारमध्ये मुख्य रस्ते पाण्याखाली सखल भागांत पाणी; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

Last Updated : Jul 6, 2022, 2:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.