मुंबई - शिवसेना नेते व खासदार संजय राऊत ( Sanjay Raut allegations on judiciary ) यांनी भाजप नेते किरीट सोमैया यांच्यावर आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी जमा केलेल्या 58 कोटी रुपयांच्या निधीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. या आरोपप्रकरणी सत्र न्यायालयाने किरीट सोमैया व त्यांचे पुत्र निल सोमैया यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. मात्र, या दोन्ही पिता-पुत्राला मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले. यावरून आता संजय राऊत ( Sanjay Raut on judiciary ) यांनी न्याय व्यवस्थेला लक्ष्य केले आहे.
हेही वाचा - IIT Mumbai : आता आयआयटी मुंबईमध्ये नवीन अभ्यासक्रम.. मास्टर ऑफ आर्ट्स बायो रिसर्च
न्यायव्यवस्थेत विशिष्ट विचारसरणीचे लोक - मागचे अनेक महिने मी बघतोय एका विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच आणि त्यांच्या समर्थकांना अटकेपासून संरक्षण मिळत आहे. त्यांचे जामीन मंजूर होतात. त्यामुळे, मी न्यायालयाचा पूर्ण आदर ठेवून हे सांगतोय या न्यायव्यवस्थेत विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचा मोठा भरणा आहे आणि हेच लोक यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
आम्हाला संरक्षण का नाही ? - इथे एका विशिष्ट पक्षाला अटकेपासून संरक्षण मिळते. मग आमची शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आमच्या पक्षाच्या लोकांना संरक्षण का मिळत नाही? त्यांचे जामीन का मंजूर होत नाहीत? त्यांना अटकेपासून संरक्षण हे न्यायालय का देत नाही? कोणताही गैरव्यवहार हा गैरव्यवहार असतो, घोटाळा हा घोटाळा. मग तो अठ्ठावन्न रुपयाचा असो अथवा 58 कोटीचा, इथे दुजाभाव का? असा थेट सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
सोमय्या इतके दिवस फरार होता आता जामीन मंजूर झाल्यावर अटकेपासून संरक्षण मिळाल्यावर समोर आला आहात. जास्त उडू नये. तुम्ही जामीनावर बाहेर आहात आणि न्यायालयाने सुद्धा स्पष्ट सांगितले आहे. तुम्हाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहावे लागेल. त्यामुळे, तुमची चौकशी होणारच आणि हा एकच नाही असे बरेच तुमचे पराक्रम आम्ही बाहेर काढणार आहोत, असा थेट इशारा संजय राऊत यांनी किरीट सोमैया यांना दिला आहे.
हेही वाचा - Alia Ranbir Wedding : आली लग्नघडी! आलिया-रणबीर होणार आज विवाहबद्ध