ETV Bharat / city

Sanjay Raut Replied To Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या बाबरी मशिदीसंदर्भातील वक्तव्याला संजय राऊतांचे उत्तर, म्हणाले... - देवेंद्र फडणवीस बाबरी मशिद वक्तव्य

बाबरी मशीद ( Babri Demolition ) कोणी पाडली, यावरून महाराष्ट्रात राजकारण रंगले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis On Babri Demolition ) यांनी बाबरी मशीद पडल्याप्रकरणी शिक्षा भोगल्याचा दावा केला. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut Replied To Devendra Fadnavis ) यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी ( BJP Leader Lalkrushna Adwani ) यांचा जुना व्हिडीओ ट्विटरवरून पोस्ट करत फडणवीसांच्या दाव्याची हवा काढली आहे.

Sanjay Raut Replied To Devendra Fadnavis

author img

By

Published : May 2, 2022, 6:42 PM IST

Updated : May 2, 2022, 6:59 PM IST

मुंबई - बाबरी मशीद ( Babri Demolition ) कोणी पाडली, यावरून महाराष्ट्रात राजकारण रंगले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis On Babri Demolition ) यांनी बाबरी मशीद पडल्याप्रकरणी शिक्षा भोगल्याचा दावा केला. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut Replied To Devendra Fadnavis ) यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी ( BJP Leader Lalkrushna Adwani ) यांचा जुना व्हिडीओ ट्विटरवरून पोस्ट करत फडणवीसांच्या दाव्याची हवा काढली आहे. त्यामुळे हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

संजय राऊतांचे ट्विटरवरून जोरदार प्रत्युत्तर - भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाबरी मशीद तोडण्यासाठी मराठी लोकांचा पुढाकार होता. ते पोलिसांना सुद्धा ऐकत नव्हते, असे विधान केले आहे. यावरून बाबरी मशीद कोणी पाडली, हे ऐकावे, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांना काढला आहे.

तसेच काही वृत्तपत्रांची कात्रणे पोस्ट केल्या होत्या. त्यात बमों से लैस शिवसेना अयोध्या जायेगे, शिवसेना के प्रदेश प्रमुख के घर पर छापा, अशा आशयाच्या बातम्या आहेत. ज्यातून शिवसेनेचा बाबरी पाडण्यातला सहभाग दिसून येत असल्याचे राऊत यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? - भाजपकडून महाविकास आघाडी विरोधात पोल-खोल सभा घेतल्या. रविवारी बूस्टर डोस सभा सोमैया मैदानात घेतली. दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर जोरदार टीका केली. तसेच बाबरी मशिद भाजपच्या कारसेवकांनी पाडली. असा ठामपणे दावा केला. बाबरी पाडण्यास शिवसेनेचा एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता. त्यामुळे शिवसेना म्हणजे हिंदुत्व नाही, शिवसेना म्हणजे मुंबई असे वक्तव्य केले होते.

हेही वाचा - Raj Thackeray Tweet : अक्षय्य तृतीयेला महाआरती करू नका; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

Last Updated : May 2, 2022, 6:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.